Nandurbar Crime News : पावणेसात लाखांच्या 11 मोटरसायकली जप्त; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Superintendent of Police along with the motorcycles seized by Nandurbar City Police. R. Patil.

Nandurbar Crime News : पावणेसात लाखांच्या 11 मोटरसायकली जप्त; दोघांना अटक

नंदुरबार : शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा तपास करताना तब्बल सहा लाख ७० हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या तपास पथकास गवसल्या आहेत. कसून चौकशी केल्यावर मोटारसायकल चोरी करणारी मोठी टोळी उघडकीस आली आहे. या टोळीकडून मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. (11 motorcycles worth 7 lakhs seized Both were arrested Nandurbar Crime News)

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहरातील मोटारसायकल चोरीच्या तपासाचे आदेश नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिले होते. श्री. कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार केली. पथकाला मोटारसायकल चोरी करणारे दोन जण जगतापवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने जगतापवाडी परिसरात सापळा रचला असता संशयित एका मोटारसायकलसह येताना दिसले.

पथकाला पाहून पळून जात असताना त्यांना पकडले. त्यांनी विजय अंता पाडवी (वय २२, रा. मटावल, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात), विनेश लक्ष्मण पाडवी, (२४, रा. जुन उंटावद, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात) अशी नावे सांगून नंदुरबार शहरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे ४० हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची हीरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच ३९, एल २३७१) मिळाली.

विजय पाडवीविरुद्ध १८ गुन्हे ः शहादा- १३, तळोदा- १२, नवापूर- २, शिरपूर- १. विनेश लक्ष्मण पाडवी याच्यावर अक्कलकुवा येथे एक व शहादा येथे एक असे दोन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: SAKAL Exclusive : कॉम्‍प्‍युटर, IT इंजिनिअरिंग ‘लई भारी..!’; अभियांत्रिकीला वाढले प्रवेश

जप्त केलेल्या मोटारसायकलींचे वर्णन

- होंडा कंपनीची सीबी १२५ शाइन एसपी विनानंबर प्लेट. शहादा पोलिसांत गुन्हा दाखल.

-काळ्या रंगाची सी.बी. युनिकॉर्न (जीजे २६,बी ७९७८). उपनगरला गुन्हा दाखल.

-निळ्या रंगाची सुझुकी कंपनीची एक्सेस मोटारसायकल. तळोदा येथे गुन्हा दाखल.

-बजाज कंपनीची १५० सीसी मोटारसायकल (एमएच २९, एम ४१८८).

-काळ्या रंगाची हीरो कंपनीची स्प्लेंडर प्लस, विनानंबरप्लेट.

-काळ्या रंगाची स्प्लेंडर प्रो (एमएच ३९, एस ९५३२).

-राखाडी रंगाची होंडा कंपनीची सी.बी. शाइन (एमएच ३९, एई ७९६८).

-काळ्या रंगाची हीरो कंपनीची एचएफ डीलक्स विनानंबरप्लेट.

-काळ्या रंगाची हीरो स्प्लेंडर प्लस, विनानंबरप्लेट.

- काळ्या रंगाची हीरो एचएफ डिलक्स, विनानंबरप्लेट

हेही वाचा: Dhule News : महापालिकेंतर्गत 30 कोटींच्या निधीचा वाद खंडपीठात; आमदार शाह यांची याचिका