SAKAL Exclusive : कॉम्‍प्‍युटर, IT इंजिनिअरिंग ‘लई भारी..!’; अभियांत्रिकीला वाढले प्रवेश

Computer Engineering Students
Computer Engineering Studentsesakal

नाशिक : बारावी उत्तीर्णांचा वाढलेला टक्‍का, औषधनिर्माणशास्‍त्र शाखेचे रखडलेले प्रवेश यांसह विविध कारणांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिसंख्येत वाढ झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्‍यात एक लाख ४५ हजार २०१ प्रवेश क्षमता असलेल्‍या ९३ विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये एक लाख ९ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

विशेष म्‍हणजे कॉम्‍प्‍युटर, इन्फॉर्मेशन ॲन्ड टेक्‍नॉलॉजी (आयटी), इलेक्‍ट्रॉनिक ॲन्ड टेलिकम्‍युनिकेशन (ई ॲन्ड टी) या शाखांना विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र सिव्हिल, मेकॅनिकल शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. (Computer IT Engineering interests Increased to engineering students ignorance towards civil mechanical Nashik News)

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पदवी अभ्यासक्रमाच्‍या (बी.ई.) प्रवेशप्रक्रियेला २१ सप्‍टेंबरपासून सुरवात झाली. एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणांच्‍या आधारे या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. प्रवेशप्रक्रियेंतर्गत तीन कॅप राउंडद्वारे प्रवेशाची संधी उपलब्‍ध झाली. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत (कट ऑफ डेट) ही २० नोव्‍हेंबर निश्‍चित करण्यात आली होती.

ही मुदत संपल्‍यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर आली. राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्‍न सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मिळून एकूण जागांपैकी कॉम्‍प्‍युटर इंजिनिअरिंग, कॉम्‍प्‍युटर सायन्‍स व त्‍याच्‍याशी संलग्‍न शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ जागांवर प्रवेश घेतले. सिव्हिल, मेकॅनिकल या शाखांच्‍या निम्‍याहून अधिक जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत.

कोरोनात आयटीमध्ये नोकऱ्या

कोरोना महामारी काळात सर्व काही ठप्प झालेले असताना आयटी क्षेत्राला ‘वर्क फ्रॉम होम’ने तारले होते. अनेक कंपन्‍यांमध्ये अद्यापपर्यंत या पद्धतीनुसार कामकाज सुरू आहे. नोकऱ्या देण्याबाबत हे क्षेत्र आघाडीवर असल्‍याने विद्यार्थ्यांकडून या क्षेत्रात करिअरला प्राधान्‍य दिले जात आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Computer Engineering Students
Winter lifestyle : गुलाबी थंडी वाढताच बदलली लाईफस्टाईल; फिरणे अन् व्यायामाचे प्रमाण वाढले

अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भातील ठळक नोंदी...

* प्रवेशासाठी विविध ९३ शाखांचे पर्याय विद्यार्थ्यांना होते उपलब्‍ध

* अभियांत्रिकीच्‍या ७५.४१ जागांवर प्रवेश निश्‍चित

* कॉम्‍प्‍युटर, आयटी, कॉम्‍प्‍युटर सायन्‍स व निगडित शाखांना सर्वाधिक प्रतिसाद

* आयओटी, मशिन लर्निंग शाखांच्‍या कमी जागा असून, मिळाला प्रतिसाद

* कृषि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश

* आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सशी संलग्‍न शाखेला चांगला प्रतिसाद

Computer Engineering Students
Measles Infection : आशादायक! मालेगावात गोवरने एकही बालमृत्यू नाही

प्रमुख शाखांमधील प्रवेशाची स्थिती

शाखा प्रवेशक्षमता प्रवेशित विद्यार्थी

कॉम्‍प्‍युर २२,०५१ २१,०५८

आयटी ११,२०५ १०,८७१

ई ॲन्ड टी १७,३६४ १५,५९८

सिव्हिल १८,६२२ ७,२७१

मेकॅनिकल २४,८१९ १२,२२९

इलेक्‍ट्रिकल ११,२४१ ७,६४१

Computer Engineering Students
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या आराखड्यामुळे पावसाचे पाणी शेतात...; शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com