
Nandurbar Crime News : बाहेर झोपलेल्यांच्या घरातून 12 मोबाईल लंपास
Nandurbar Crime News : तळोदा शहरात एकाच रात्रीतून विविध ठिकाणाहून सुमारे १२ मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. (12 mobile phones were stolen from house of the sleeping outside nandurbar news)
रात्री गरम होते म्हणून घराच्या बाहेर झोपलेल्या नागरिकांच्या घरातून चोरट्यांनी घरात घुसून मोबाईल लंपास केले. तळोदा शहरात एकाच रात्रीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून १२ मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना सहा जूनच्या रात्री घडली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहरातील तहसील रोडलगत मलक वाडा परिसरातून शेख जुबेर शेख, इसरार खान नजीर खान यांचे तीन मोबाईल, तर हमीद खा रज्जाक कुरेशी यांचे तीन मोबाईल, इलाही चौकात राहणारे कलीम शेख यांचे तीन मोबाईल सात जूनच्या रात्री लंपास केल्याची घटना घडली आहे.
अन्य ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. संबंधितांनी तळोदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.