Dhule News : शेतकऱ्यांना दिवाळी भेट; कालवा वितरिकांसाठी 14 कोटींची मंजुरी

Agitation of Jalakrosh Committee.
Agitation of Jalakrosh Committee.esakal
Updated on

Dhule News : साक्री तालुक्यातील लाटीपाडा (पांझरा मध्यम प्रकल्पाच्या) वाढीव उजवा कालवा वितरिकेच्या ४० वर्षे रखडलेल्या कामाला गती मिळाली आहे. कालवा उपवितरिका या कामाच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

सुमारे पंचवीसशे शेतकऱ्यांच्या तीन वर्षांच्या आंदोलनास अखेर यश मिळाले. जलअक्रोश शेतकरी आंदोलन समितीचे ॲड. युवराज तोरवणे व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी माहिती दिली.(14 crore sanctioned for Diwali gift canal distribution to farmers dhule news )

माजी आमदार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाचा आशय असा : साक्री तालुक्यातील लाटीपाडा उजव्या कालव्यांतर्गत कायम दुष्काळी व कोरडवाडू शेती असणाऱ्या बेहेड, विटाई, दारखेल, नाडसे व निळगव्हाण या काटवान परिसराला ४० वर्षांत वाढीव उजव्या कालव्याचे पाणी मिळाले नाही. लाभक्षेत्रात येऊनही हा परिसर पाण्यावाचून कायम वंचित राहिला.

शेती आणि पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने २०२० पासून जलअक्रोश समिती स्थापन करून स्थानिक शेतकऱ्यांनी लढा उभारला होता. वेळोवेळी मंत्रालय, साक्री रोडवरील सिंचन भवन, तापी पाटबंधारे विभाग जळगाव, प्रधान सचिव जलसंपदा, जलसंपदामंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदने देऊन लढा उभारला होता.

Agitation of Jalakrosh Committee.
Dhule News : अध्यक्षांना राजीनामा देण्याचे सूचित : पालकमंत्री महाजन

सातत्यपूर्ण आंदोलने

धुळे शहरात शेतकऱ्यांना घेऊन सिंचन विभागाला घेराव टाकणे, जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी महिलांचा मोर्चा काढणे, तापी पाटबंधारे विभागावर शिदोरी आंदोलन करणे, कामगारदिनी पहाटे पाचला मुख्यमंत्र्यांना हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यास मज्जाव करुरून अटक करून घेणे, मंत्रालयात प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयावर घेराव टाकून अटक करून घेणे, मंत्रलयातील नियोजन विभागाच्या लालची अधिकाऱ्यांना फायली पुढे न सरकविल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांच्या शालेय मुला-मुलींना घेऊन पैशांचे हार घालून मंत्रालयात सत्कार करणे अशी विविध आंदोलने करून याप्रश्नी निधी मंजूर करून घेण्यासाठी तीन वर्षे अखंड प्रयास केले. या प्रयासांना अखेर यश आले आहे.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्याची आशा

वितरिकांच्या कामासाठी १३ कोटी ८३ लाख ६९ हजार ८७१ एवढ्या खर्च्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित चार कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी विचाराधीन असून, एकूण १७ कोटींची कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Agitation of Jalakrosh Committee.
Dhule News : युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे : पालकमंत्री महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com