Dhule Hire Medical College : हिरे मेडिकल कॉलेजसाठी 15 कोटींचा निधी मंजूर

hire medical collage
hire medical collageesakal
Updated on

Dhule News : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चर हॉल व परीक्षा हॉलसाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. (15 crore fund approved for Hire Medical College dhule news)

वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याची माहिती भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली.

शहरालगत चक्करबर्डीतील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अत्याधुनिक व्हावे, तसेच खानदेशातील विद्यार्थ्यांना उच्चतम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी खासदार डॉ. भामरे यांनी सतत मंत्री महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

hire medical collage
Nashik: अधिकारी निवृत्त अन चौकशींचा फेरा कायम; उत्तर महाराष्ट्रातील प्रकरणांच्या निपटाऱ्याचा प्रश्‍न अनुत्तरीत

यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयास विविध विभागातील अर्थात पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक परीक्षा हॉल व लेक्चर हॉलच्या बांधकामासाठी १४ कोटी ८९ लाख १३ हजाराच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालय आधुनिक व सुसज्ज होईल. खानदेशातील विद्यार्थ्यांची सोय होईल, असे सांगत पाठपुराव्याबद्दल श्री. अग्रवाल यांनी मंत्री महाजन, खासदार डॉ. भामरे यांचे आभार मानले आहेत

hire medical collage
Nandurbar Traffic Problem : वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच; वाहनधारकांची डोकेदुखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com