Dhule News : शास्तीमाफी योजनेच्या पहिल्या दिवसाची स्थिती मनपा तिजोरीत 16 लाख ; साडेअकरा लाख रुपये माफ

Dhule News
Dhule News esakal

धुळे : मालमत्ता करावरील शास्ती (दंड)माफी योजनेंतर्गत सोमवारी (ता. ६) पहिल्या दिवशी महापालिकेच्या तिजोरीत १६ लाख रुपये जमा झाले, तर या योजनेमुळे महापालिकेने संबंधित थकबाकीदारांचे तब्बल साडेअकरा लाख रुपये माफ केले.

मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी जाहीर केला. त्यानुसार ६ ते ११ फेब्रुवारी असे सहा दिवस या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेच्या सोमवारी पहिल्या दिवशी थकबाकीदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले. (16 lakhs in municipal treasury on the first day of penalty amnesty scheme One and a half lakh rupees waived Dhule News )

दिवसभरात २०७ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. यातील १८३ थकबाकीदारांनी प्रत्यक्ष (कॅश) कराचा भरणा केला. यातून एकूण १२ लाख ७४ हजार ९४ रुपये जमा झाले. नऊ थकबाकीदारांनी धनादेशाद्वारे एक लाख २१ हजार ५१ रुपये कर भरला, तर १५ थकबाकीदारांनी ऑनलाइन कर भरला. यातून दोन लाख ११ हजार ९९९ रुपये जमा झाले. त्यामुळे दिवसभरात एकूण १६ लाख सात हजार १४४ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले.

साडेअकरा लाख माफ

शास्तीमाफी योजनेत थकबाकीदारांना शंभर टक्के शास्ती माफ करण्यात आली आहे. त्यामुळे जे थकबाकीदार आता कर अदा करत आहेत, त्यांना मालमत्ता करावरील शास्ती संपूर्णपणे माफ होत आहे. योजनेच्या पहिल्या दिवशी सोमवारी अशा थकबाकीदारांचे तब्बल ११ लाख ५१ हजार ४५३ रुपये माफ झाले.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Dhule News
Dhule Maha Marathon : धुळेकरांमुळे मॅरेथॉन स्पर्धा Super Hit; विजेत्यांचा थाटात गौरव!

पाच दिवस उरले

मनपा आयुक्तांनी घोषित केलेल्या शास्तीमाफी योजनेचा कालावधी ६ ते ११ फेब्रुवारी असा आहे. त्यामुळे आता केवळ पाच दिवस या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेच्या लाभासाठी महापालिकेने काही अटी-शर्ती घातल्या आहेत.

यात यापूर्वी शास्तीची सर्व रक्‍कम अदा केलेल्या मालमत्ताधारकांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

तसेच योजनेंतर्गत कोणत्याही स्वरूपाचा परतावा दिला जाणार नाही, या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणे आवश्यक राहील, मालमत्ता करासंबंधी न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास प्रथमतः हा दावा न्यायालयातून काढून घेऊन त्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर शास्तीमाफी योजनेचा लाभ घेता येईल.

Dhule News
Dhule News : महापालिकेत अवतरणार महिलाराज!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com