marathon
marathonesakal

Dhule Maha Marathon : धुळेकरांमुळे मॅरेथॉन स्पर्धा Super Hit; विजेत्यांचा थाटात गौरव!

Published on

धुळे : नोंदणीपासून अभूतपूर्व प्रतिसाद देणाऱ्या धुळेकरांनी येथील पहिली जिल्हास्तरीय मॅरेथॉन (Marathon) स्पर्धा `सुपर हीट` केली. न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. (maha marathon first district level competition Superheat dhule news)

त्यामुळे धुळेकरांसह प्रभावित मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी आयोजक जिल्हा पोलिस प्रशासनावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यात विजेत्यांना दोन लाखांवर रुपयांची रोख पारितोषिके, मेडल, करंडक प्रदान करत या आनंदमयी सोहळ्यावर कळस रचण्यात आला. या स्पर्धेसाठी सकाळ माध्यम समूह माध्यम प्रायोजक होता.

येथील पोलिस कवायत मैदानावर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या पुढाकाराने रविवारी (ता. ५) सकाळी सहाला मॅरेथॉन स्पर्धा झाली. तीत २० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावर जत्रा, आनंद मेळाव्याची अनुभूती आली.

ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर- पाटील, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

marathon
Nashik News : सावकाराच्या जाचाला कंटाळून भावांनी घेतले विष; एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू

`सकाळ`च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त विजय सनेर, बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे प्रवर्तक बाळासाहेब भदाणे, भावी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलिस अधीक्षक ह्रषीकेश रेड्डी, पराग बेडसे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले,

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, उद्योजक जितेंद्र चवटीया, बिल्डर पराग अहिरे, सारांश भावसार, स्पर्धेचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर पुणेस्थित सहायक आयुक्त विजय चौधरी, मृणाल गायकवाड, अल्फा अग्रवाल, रोटरी क्लबच्या पिंकी पटेल, आशिष अजमेरा, उद्योजक संजय अग्रवाल, संदीप अग्रवाल, आर्यनमॅन अश्‍विनी देवरे आदी प्रमुख पाहुणे होते. निर्धारित मार्गावर सकाळी सहा ते साडेआठपर्यंत जल्लोषात स्पर्धा झाली. स्पर्धेत राज्यभरातूनही स्पर्धक सहभागी झाले.

मॅरेथॉनचे विजयी स्पर्धक :

marathon
SAKAL EXCLUSIVE : सुरक्षित क्षेत्रात चार लाख विहिरी शक्य; भूजल सर्वेक्षणचा अहवाल

मॅरेथॉन स्पर्धेतील पुरुष, महिला विजयी स्पर्धक अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने असेतीन किलोमीटर (फॅमिली रन) - जयेश विलास पाटील, विकी अनिल पाटील, साहिल अशोक कोळी. स्वाती कैलास हिरे (मोहाडी), शिवानी बाळू पाटील (शिरपूर), समीक्षा दिलीप गावित (नवापूर).

पाच किलोमीटर (ड्रीम रन) ः साहिल संजय गांगुर्डे (कळवण), धीरज चतुर पाटील, सुनील रामदास बारेला (जळगाव). शकिला पाशा वसावे (शिरपूर), आरती अर्जुन पावरा (धडगाव), निलू गिर्जेश यादव (मोहाडी),

दहा किलोमीटर ः दीपक गणपत शिरसाट, विकी आंबेकर, सोमनाथ भगवानसिंग पावरा. शेवंता तुळशीराम पावरा, महेक मंगलदास वसावे, सोनाली गलपत पाडवी.

२१ किलोमीटर ः उदयसिंग पाडवी, वृषभ राजेश तिवसकर, कुमार भगतसिंग वळवी. बायजा कुवशा पावरा, अश्‍विनी देवरे (नाशिक), डॉ. ममता मोरे

marathon
Nashik News : व्यापाऱ्यांकडून लॉबिंगद्वारे द्राक्ष उत्पादकांचा घात! वातावरण बदलाचे फुसके कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com