अमळनेर- राज्यातील काही सैनिकी शाळांमध्ये वेतन झाले नसल्याने शिक्षकांचे मराठी नववर्ष अंधारात जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. या शिक्षकांच्या वेतनासाठी राज्य सैनिकी शाळा कृती समितीने शासनाकडे पाठपुरावा केल्यावर शासनाने या शिक्षकांच्या वेतनासाठी १७ कोटी ४६ लाख ८७ हजार २३० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले. त्यामुळे राज्यातील २३१ शाळांमधील एक हजार ३२६ शिक्षकांचा वेतन प्रश्न मार्गी लागला आहे.