Nandurbar News : वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना कारावास
नंदुरबार : वीजचोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या दोन आरोपींना (Accused) शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतीच सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
शहाद्यातील संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (2 accused found guilty in separate cases of electricity theft were sentenced to 6 months imprisonment by Court nandurbar news)
महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे, सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता आर. के. गायकवाड, कनिष्ठ तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे यांच्या पथकाने शहादा येथे तपासणी मोहीम राबविली.
८ डिसेंबर २०१५ ला केलेल्या तपासणीत गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या श्रीधर रमेश चौधरी याने मीटरमध्ये फेरफार करून तीन लाख १८ हजार ६८० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले, तर ९ डिसेंबर २०१५ ला या तपासणीत महालक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या संजय ताराचंद चौधरी याने मीटरला जॅमर लावून तीन लाख ११ हजार ३१० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले.
दोन्ही आरोपींनी वीजचोरीचे निर्धारित बिल न भरल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी चालली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी यांना सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एस. ए. गिरासे यांनी महावितरणची बाजू मांडली.शहाद्यातील संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे, सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता आर. के. गायकवाड, कनिष्ठ तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे यांच्या पथकाने शहादा येथे तपासणी मोहीम राबविली.
८ डिसेंबर २०१५ ला केलेल्या तपासणीत गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या श्रीधर रमेश चौधरी याने मीटरमध्ये फेरफार करून तीन लाख १८ हजार ६८० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले, तर ९ डिसेंबर २०१५ ला या तपासणीत महालक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या संजय ताराचंद चौधरी याने मीटरला जॅमर लावून तीन लाख ११ हजार ३१० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले.
दोन्ही आरोपींनी वीजचोरीचे निर्धारित बिल न भरल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी चालली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी यांना सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एस. ए. गिरासे यांनी महावितरणची बाजू मांडली.