जीवघेणा प्रवास करत 'स्कूल चले हम'..!.वाचा

रोशन भामरे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

रोशन भामरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावे दिगर येथील आपटेपाडा आणि दरा शिवारातील जवळपास तीनशे नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला असून त्याचबरोबर तेथील तीस ते चाळीस शालेय विद्यार्थी देखील शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर नदीचे पाणी काही प्रमाणात कमी झाल्यांनंतर बंधाऱ्यावरून दोराच्या आधारने चढ उतर करत जीवघेणा प्रवास करून शाळेत यावे लागत आहे

 

नाशिक : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील पठावे दिगर येथील आपटेपाडा आणि दरा शिवारातील जवळपास तीनशे नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला असून त्याचबरोबर तेथील तीस ते चाळीस शालेय विद्यार्थी देखील शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर नदीचे पाणी काही प्रमाणात कमी झाल्यांनंतर बंधाऱ्यावरून दोराच्या आधारने चढ उतर करत जीवघेणा प्रवास करून शाळेत यावे लागत आहे.

  विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व ग्रामस्थां गावात येण्यासाठी हत्ती नदीवर गाडघोसर शिवारतील बांधलेल्या केवेअर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना दोरखंडबांधले असून त्यावरून एका बाजूने उतरून बंधाऱ्यावरून उद्या घेत पुन्हा दुसऱ्याबाजूने दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार करावी लागते. तसेच जर बंधाऱ्यावरून जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्यास तासनतास पाणी कमी होण्याची वाट पाहून, पाणी कमी झाल्यानंतरच नदी पार करावी लागत असल्यामुळे स्थानिकांना गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना महिनाभर शाळेला दांड्या माराव्या लागत आहेत.

पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी 

गेल्या दोन महिन्यापासून पठावे दिगरसह परिसारत मोठ्याप्रमाणात पाऊस सुरु असल्याने येथील भंडारदरा धरण पूर्ण भरल्याने गेल्या दोन महिन्यापासून हत्तीनदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरात पिसोरे,चिंचपाडा,मळगाव आदी गावातील जवळपास दोन ते तीन हजार हेक्टरभागातील डोंगरावर मोठ्या प्रामाणात जंगल असल्यामुळे जंगलातून वाहत येणाऱ्या नाल्यांचा प्रवाह देखील खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे देखील स्थानिकांना अनेक नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो तसेच आपल्या शेतातील पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी देखील पाणी कमी होण्याची वाट बघावी लागत आहे. शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी फरची पूल बांधून देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया

“आम्हाला शाळेत जाण्यासाठी नदीच्या दोराच्या आधारे बंधाऱ्यावर त्यानंतर बंधाऱ्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. तर कधी कधी नदीला जास्तच पूर आला तर दहा ते पंधरा दिवस आम्ही शाळेतच जात नाही” – विद्यार्थी

“ नदी व नाल्यांना पाणी आल्यावर आमचा गावाशी संपर्क तुटतो, जर कोणाची अचानक तब्ब्येत खराब झाली तर त्या व्यक्तीस कितीही त्रास झाला तरी दवाखान्यात घेऊन जाने  सुद्धा अम्हाला शक्य नाही.तयार शेतमाल शेतातच पडून आहे त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपयोजना कराव्यात.”- नारायण पवार, अपंग युवक पठावे दिगर  

“ आम्ही तर बंधाऱ्यावरून किंवा पाण्यातून रस्ता काढत महत्वाच्या कामासाठी गावात जीव धोक्यात घालून जातो मात्र, आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना आणि घरी आणताना दोराचा आधार घ्यावा लागतो तर मोरीच्या ठिकाणी आम्ही एक दोन पालक मुलांना एकमेकांच्या मदतीने उचलून देत मोठ्या कसरतीने आम्ही नदी पार करून देतो” – सुनील पवार,पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा