Dhule Crime News: गांजाची तस्करी ‘एलसीबी’ने रोखली; धुळ्यात ट्रकसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Officers and team present with the items seized by the police.
Officers and team present with the items seized by the police. esakal

Dhule Crime News : शहरातून होणारी गांजा तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली. चाळीसगाव रोड चौफुलीवर ट्रकला पकडले. चालकाला ताब्यात घेत पाच लाखांच्या गांजासह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई रविवारी (ता. १७) सायंकाळी केली. (22 lakh worth of goods seized including a truck in Dhule crime news)

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली येथे ट्रक (एमएच १८ ओओ १२६८) उभा आहे. त्यात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे मादक पदार्थ असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शोध घेतला असता चाळीसगाव रोड चौफुलीजवळील एका पेट्रोल पंपालगत मोकळ्या जागेत संशयित ट्रक उभा दिसला.

ट्रकचालकाने आबिद हुसैन शेख (रा. नूर मशिद, ८० फुटी रोड, शिवाजीनगर, धुळे) असे नाव सांगितले. ट्रकची तपासणी केली असता केबिनमध्ये हिरवट, पिवळसर व अर्धवट सुकलेला पाने, बिया, काड्या असलेल्या गांजासदृश पदार्थ मिळून आला. त्याने हा माल धुळ्यातील एकाच्या सांगण्यावरून सूरत (गुजरात) येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

Officers and team present with the items seized by the police.
Dhule Crime News : विखरणीत 5 घरामध्ये जबरी घरफोडी; 7 लाखांचा ऐवज चोरी

चालकाला ताब्यात घेत पाच लाख एक हजार ३७५ रुपयांचा गांजा, १२ लाखांचा ट्रक, तीन लाख ३७ हजार ८६९ रुपयांची सरकी, अडीच लाखांचे फटाक्यांचे १५३ बॉक्स, असा एकूण २२ लाख ८९ हजार २४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुणवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून आबिद हुसैन शेख याच्यासह दोघांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, गणेश फड, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप सरग, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, नीलेश पोतदार, सुशील शेंडे, सागर शिर्के, हर्शल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Officers and team present with the items seized by the police.
Dhule Crime News : देवपूरातील 3 कॅफेंवर पोलिसांचा छापा; कॅफेचालकांविरूद्ध गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com