Dhule News : Water grid योजनेला 274 कोटी मंजूर

Jaykumar Rawal
Jaykumar Rawalesakal

धुळे : मंत्री असतानाच्या काळात प्रस्तावित केलेल्या ८५ गाव पाणीपुरवठा योजनेला अर्थात वॉटर ग्रीड योजनेला अखेर केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी २७४ कोटी १९ लाख ४४ हजारांचा निधी मंजूर झाला आहे, या प्रक्रियेमुळे आता दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईशी सामना करणारी गावे आता कायमस्वरूपी टंचाईमुक्त होतील, असा विश्‍वास माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

आमदार रावल म्हणाले, मराठवाडा ग्रीड योजनेच्या धर्तीवर शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी ही योजना मी मंत्री असतानाच्या काळात प्रस्तावित केली होती. नंतर सत्तांतरामुळे ही योजना मागे पडली. परंतु, केंद्र सरकारने जल जीवन मिशन हाती घेतल्याने त्यात शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावे ग्रीड योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार २७४ कोटींचा निधी मंजूर झाला. या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. (274 crore sanctioned for water grid scheme Jalgaon News pvc99)

Jaykumar Rawal
Nashik Crime News : लाच घेताना घोटीतील पोलिसाला अटक

पाठपुराव्याला यश

कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून शिंदखेडा तालुक्याची गणना होते. या ठिकाणी दरवर्षी जवळपास ८० ते ८५ गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो. त्यात कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी मंत्रिपदाच्या काळात अधिकाऱ्यांकडून मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या धर्तीवर शिंदखेडा तालुका ८५ गावे ग्रीड योजना तयार केली. तिचे फडणवीस सरकारच्या काळात सादरीकरण झाले होते. नंतर राज्यात सत्तांतर झाल्याने ही योजना रखडली. या दरम्यान केंद्र सरकारने जल जीवन मिशनमधून या योजनेला निधी देण्याबाबत तयारी दर्शविली. यात समावेशासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे सतत आग्रही पाठपुरावा केला. त्याला निधी मंजुरीमुळे यश आल्याचे आमदार रावल यांनी सांगितले.

दर दिवशी पाणीपुरवठा

तालुक्यातील ८५ गावे ग्रीड योजनेसाठी तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजजवळ मोठे पंप हाऊस तयार होईल. तेथून क्रांती स्मारकाशेजारी दीडशे मीटर उंचीवरील डोंगरावर पाणी आणले जाईल. या ठिकाणी मोठे फिल्टर प्लांट तयार केले जाईल. प्रत्येक गावाच्या जलकुंभाची उंची ही सरासरी १५ मीटरपेक्षा जास्त नसते. त्यामुळे प्रत्येक गावाला हे फिल्टर पाणी सारख्याच दाबाने जलकुंभात जाईल. लोकसंख्येनुसार प्रति माणसी ६० लिटर पाणी दर दिवशी त्या-त्या गावांना देण्यात येणार आहे, असेही आमदार रावल यांनी नमूद केले.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Jaykumar Rawal
Election 2022 : पिंपळगाव ग्रामपंचायतीची रणसंग्राम सुरु

या गावांना मिळेल लाभ

शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावे वॉटर ग्रीड योजनेंतर्गत चांदगड, डांगुर्णे, सोंडले, खलाणे, धांदरणे, डाबली, होळ, दसवेल, टेंभलाय, निरगुडी, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे, अंजदे, पिंप्राड, निसाणे, म्हाळपूर, बाभुळदे, चिरणे, कदाणे, वाघाडी खु, वाघाडी बु., कंचनपूर, बाभळे, कलमाडी, माळीस, वाघोदे, जातोडे, मेलाणे, गोराणे, विटाई, पिंपरखेडा, सार्वे, वायपूर, रोहाणे, दराणे, तामथरे, सवाईमुकटी, चिमठावड अमराळे, जखाणे, चिमठाणे, पिंप्री, दलवाडे प्र. सो., आरावे, शेवाळे, वाडी, दरखेडा, अलाणे, परसामळ- कुमरेज, साळवे, सोनशेलू, हातनूर, भडणे, वरूळ-घुसरे, चौगांव बु, चौगांव खु, दलवाडे प्र. नं., जोगशेलू, वरझडी, मेथी, कामपूर, विखरण, रहिमपुरे, विखुर्ले, अंजनविहीरे, खर्दे, मांडळ, देगांव, सतारे, देवी, रेवाडी, परसुले, कर्ले, देवकानगर, अक्क्लकोस, सुराय, चुडाणे, कलवाडे, मालपूर, धावडे, झिरवे, रामी, पथारे आदी गावांचा समावेश आहे.

Jaykumar Rawal
Nashik Crime News : सोन्याची नाणी विकत घेणे पडले महागात; दोघांना बसला 10 लाखाचा गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com