Gharakul Yojana : तब्बल 3 हजार 169 घरकुले अपूर्णावस्थेत; 978 घरकुलांची कामच सुरू नाहीत?

Gharakul Yojana
Gharakul Yojanaesakal

तळोदा (जि. नंदुरबार) : गोरगरिबांना स्वप्नातील हक्काचे घर मिळण्यासाठी असणाऱ्या घरकुल योजनांमधील तब्बल तीन हजार १६९ घरकुले तळोदा तालुक्यात अद्यापही अपूर्ण आहेत. त्यात ९७८ घरकुलांचे काम सुरूच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. (3 thousand 169 houses are incomplete 978 houses work not done in Gharkul yojana nandurbar news)

त्यामुळे घरकुले पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर जनजागृतीसह गावोगावी भेट दिली जात आहे. दुसरीकडे अपूर्ण राहिलेली घरकुले मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून यंत्रणेला मिळाल्या आहेत. दिलेल्या मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तळोदा तालुक्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेत दहा हजार ६२१ घरकुले मंजूर होती. त्यांपैकी नऊ हजार ४२९ घरकुले पूर्ण झाली असून, एक हजार १७५ घरकुले मात्र अपूर्ण आहेत.

२६६ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीत २०२१-२२ या आर्थिक वर्षात २०१३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यांपैकी ४७१ घरकुले पूर्ण झाली असून, एक हजार ६२२ घरकुले अपूर्ण आहेत. त्यातील ६०७ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.

शबरी आवास योजनेत २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक हजार ४६१ घरकुले मंजूर आहेत. त्यांपैकी एक हजार १०५ घरकुले पूर्ण असून, ३३९ घरकुले अपूर्ण आहेत. ९९ घरकुलांचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. रमाई आवास योजनेत २४६ घरकुले मंजूर असून, २०६ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर ३३ घरकुले अपूर्ण आहेत व ६ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Gharakul Yojana
Dhule News : मुंबई पोलिस दी ग्रेट..! लाखाच्या वस्तूचा दोन तासांत शोध

घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२३ पर्यंत घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. तरीही बांधकाम सुरू न झाल्यास फेब्रुवारीअखेर अशी घरकुले रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

त्यानंतर शासनाकडून कुठलाही निधी दिला जाणार नसल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घरकुले पूर्ण करून घेण्याचे यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. याकरिता अमृत महाआवास अभियानांतर्गत जलदगतीने घरकुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लाभार्थ्यांना सूचना

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली अमृत महाआवास अभियानांतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, सहाय्यक गटविकास अधिकारी के. एम. पवार, विस्ताराधिकारी बी. के. पाटील यांनी प्रतापपूर येथे भेट देऊन लाभार्थ्यांना घरकुले पूर्ण करण्याचा सूचना दिल्या. तशी मोहीम तालुक्यातील सर्व गावांत राबविली जाणार आहे.

Gharakul Yojana
Nashik Graduate Constituency : पदवीधर मतदारांना नाव शोधणे होणार सुलभ! येथे करा क्लिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com