Nashik Graduate Constituency : पदवीधर मतदारांना नाव शोधणे होणार सुलभ! येथे करा क्लिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Graduate Constituency Election

Nashik Graduate Constituency : पदवीधर मतदारांना नाव शोधणे होणार सुलभ! येथे करा क्लिक

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात आपले नाव आहे, याची माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने एक लिंक तयार केली आहे.

ही लिंक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (Nashik Graduate Constituency It will be easy for graduate voters to find names through link nashik news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या लिंकमुळे पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे सोपे होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणूक-२०२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे.

मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे.

सदर लिंक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर (Homepage) प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी कळविले आहे.