Dhule News : मोबाईल टॉवर कंपन्यांकडे साडेतीन कोटी थकीत; महापालिकेकडून नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : मोबाईल टॉवर कंपन्यांकडे साडेतीन कोटी थकीत; महापालिकेकडून नोटिसा

धुळे : महापालिका क्षेत्रात विविध कंपन्यांचे अनेक मोबाईल टॉवर उभे आहेत. आजघडीला सुमारे ८० मोबाईल टॉवरपोटी संबंधित कंपन्यांकडे महापालिकेचे तीन ते साडेतीन कोटी रुपये थकबाकी आहे.

थकबाकी भरण्याबाबत महापालिकेने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, नोटिसा दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. १७) महापालिकेच्या पथकाने मोहाडी उपनगर येथील एका कंपनीचा मोबाईल टॉवर सील केला. (3.5 crore due to mobile tower companies Notices from the Municipal Corporation dhule news)

हेही वाचा: Nashik News : वणी- नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर गाडी संपूर्ण जळून खाक!

धुळे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवर उभे आहेत, आजही उभे राहत आहेत. यातील किती टॉवर अधिकृत आणि किती अनधिकृत हा मात्र संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, हे मोबाईल टॉवर उभे करणाऱ्या संबंधित कंपन्यांकडून महापालिका मालमत्ता कर वसूल करते. हा कर भरताना संबंधित कंपन्यांकडून मात्र दिरंगाई होते.

त्यामुळे दर वर्षी महापालिकेकडून अशा थकबाकीदार कंपन्यांवर कारवाई होते. यंदाही अशी कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार शहरात १२९ मोबाईल टॉवर आहेत. यातील ५० मोबाईल टॉवरपोटीचा कर संबंधित कंपन्यांनी अदा केला आहे. साधारण एक ते दीड कोटी रुपये या कंपन्यांकडून कर वसुली झाली आहे.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका

नोटिसा, कारवाई

रेकॉर्डवरील १२९ पैकी ७९ मोबाईल टॉवरपोटी संबंधित कंपन्यांकडे महापालिकेची थकबाकी आहे. ही थकबाकी साधारण तीन ते साडेतीन कोटी रुपये आहे. थकबाकी भरण्यासाठी महापालिकेने यंदाही संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील बडगुजर प्लॉट भागातील टॉवर व्हिजन कंपनीचा मोबाईल टॉवर पथकाने सील केला होता. या कारवाईनंतर कंपनीने ५० टक्के रक्कम अदा केली आहे, मात्र तरीही मनपाने सील उघडलेले नाही. दरम्यान, मंगळवारी (ता. १७) महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वसुली पथकाने मोहाडी उपनगर येथे प्रमिला वामन ठाकूर यांच्या जागेवरील एटीसी कंपनीचा मोबाईल टॉवर सील केला. कंपनीकडे महापालिकेची चार लाख ७७ हजार १९७ रुपये थकबाकी आहे. वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, निरीक्षक अजय देवरे, मनोज चिलंदे, संजय माईनकर आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Pune Crime News : मेट्रो सुरू व्हायच्या आधीच चोरट्यांनी मारला डल्ला; साहित्याची चोरी

अनधिकृत टॉवरचा प्रश्‍न सुटेना

काही वर्षांपूर्वीच धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले गेल्याचा प्रश्‍न गाजला होता. त्यानंतरही शहरात अनेक मोबाईल टॉवर उभारले गेले. हद्दवाढीनंतर यात भरच पडली आहे. आजही विनापरवानगी टॉवर उभारले जातात. ९ जानेवारीला शहरातील वाडीभोकर रोडवरील अशाच एका विनापरवानगी टॉवरच्या कामावर मनपा पथकाने कारवाई केली. अशा प्रकारांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे महापालिकेच्या अंदाजपत्रकातदेखील ‘अनधिकृत टॉवरपोटी वसुली’ अशा हेडखाली उत्पन्न दाखविले जाते.

हेही वाचा: Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका