Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On Aurangabad Road, Mirchi Hotel Chauphuli signal is off due to the exercise of motorists.

Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका

नाशिक : औरंगाबाद रोडवर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स बस अपघातात १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडून काही महिनेच उलटलेले असताना, या ठिकाणची सिग्नल यंत्रणा पुन्हा बंद पडली आहे.

त्यामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे पुन्हा अपघाताचा धोका निर्माण झाला असून, पोलिस अन्‌ महापालिका प्रशासनाची उदासीनताच यातून स्पष्ट होते आहे. (mirchi hotel signal on Aurangabad Road closed again Risk of accidents due to reckless driving Nashik News)

औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर गेल्या ऑक्टोबर महिन्यात पहाटेच्या सुमारास ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात भीषण अपघात होऊन १२ प्रवाशांचा लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने साऱ्या यंत्रणा हादरल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ बॅकस्पॉटवर अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. या अपघातामुळे खडबडून जाग आलेल्या पोलिस आणि महापालिका यंत्रणेने मिरची हॉटेल चौफुलीवरील अतिक्रमण काढले. सिग्नल यंत्रणा अद्ययावत केली. तसेच, चौफुलीवरील चारही रस्त्यांवर गतिरोधक टाकून झेब्रा पट्टे मारले.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

हेही वाचा: Dhule News : स्वावलंबनाचा लामकानी शेतकरी पॅटर्न; गटशेतीचा लाभ

औरंगाबादरोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवरील सिग्नल बंद असतानाही भरधाव जात असलेली वाहने.

औरंगाबादरोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवरील सिग्नल बंद असतानाही भरधाव जात असलेली वाहने.

औरंगाबादरोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवरील सिग्नल बंद असतानाही भरधाव जात असलेली वाहने

औरंगाबादरोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवरील सिग्नल बंद असतानाही भरधाव जात असलेली वाहनेमात्र, आज याच चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा बंद होती. त्यामुळे अपघातग्रस्त या चौफुलीवरील रहदारी विस्कळित झाली होती. सदरील चौफुलीवर मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे, सध्या लग्नसराई असल्याने यामार्गांवरच बहुतांशी मंगल कार्यालये असल्याने नागरिकांचीही मोठी वर्दळ असते.

त्यामुळे सिग्नल यंत्रणाच बंद राहिल्यास वाहतूक बेशिस्त होऊन पुन्हा मोठी अपघाती दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभर सदरील सिग्नल यंत्रणा बंद होती. याकडे ना पोलिसांचे लक्ष गेले, ना महापालिकेच्या संबंधित विभागाने सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून ती पुन्हा सुरू करण्याची तसदी घेतली. यातून प्रशासनाची उदासीनता व फोलपणाच पुन्हा समोर आला आहे.

हेही वाचा: Dhule Crime News : नाशिकच्या वीटभट्टीचालकाला दीड लाखाला लुटले! 7 संशयितांविरोधात गुन्हा दाखल