Dhule Water Scarcity : पाण्यासाठी दाही दिशा...! जिल्ह्याची पाणीटंचाईकडे वाटचाल

Water scarcity
Water scarcityesakal

Dhule News : कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत असून, धुळे जिल्ह्याचे तापमान ४० अंशांपर्यंत पोचले आहे. प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. (37 percent of small and medium water useful water resources in dhule news)

जिल्ह्यातील लघु व मध्यम पाण्याचा उपयुक्त साठा अवघा ३७ टक्के असून, पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३४ टक्के साठा होता. पाण्याची यंदाची ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा मे व जूनमध्ये अनेक गावांना पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली असून, काही गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पात सध्या १८२.९० दशलक्ष घनमीटर एवढाच साठा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात १५३.४३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५३ टक्के म्हणजे बऱ्यापैकी जलसाठा आहे.

धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४.८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्ष घनमीटर एवढी असताना अवघा ३०.९६ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २५ टक्के साठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १५१.९४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४१ टक्के साठा आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Water scarcity
Dhule News : सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेशवाटपाला मुहूर्त कधी? इतर आवश्‍यक साहित्याबाबतही बोंबच..

धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वांत जास्त ४२.७५ दशलक्ष घनमीटर जलसाठा सुलवाडे प्रकल्पात आहे, तर सर्वांत कमी ०.८५ दशलक्ष घनमीटर साठा कनोली प्रकल्पात, तर सोनवद प्रकल्पात अवघा १.१५ दशलक्ष घनमीटर साठा आहे.

बहुतांश लघुप्रकल्पांत अत्यल्प साठा आहे. ४७ पैकी अवघ्या चारच लघुप्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा आहे. ३४ लघु प्रकल्पांत १ ते ५० टक्के साठा असून, नऊ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून, त्यांच्यात शून्य टक्के पाणी आहे. यंदा पावसाळ्यात सरासरीएवढा पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने यंदा प्रकल्प भरतील व शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा आहे.

कोरडे लघुप्रकल्प

धुळे जिल्ह्यातील बुरझड, कुलथे, मांडळ, निमगूळ, मेथी, शेवाडे, रोहिणी, काबऱ्याखडक, कायतांडा अशा नऊ लघुप्रकल्पांत शून्य टक्के पाणी असून, त्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.

Water scarcity
Shirpur Market Committee Election : 19 अर्ज माघारी, 37 उमेदवार रिंगणात

सोनगीर येथील पाझर तलाव आटल्याने व जामफळ प्रकल्पाचे काम सुरू असल्याने दोन्ही मुख्य स्रोत बंद पडले असून, गावाला आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. लवकरच उपाययोजना न झाल्यास गंभीर टंचाईला तोंड द्यावे लागेल.

आकडे बोलतात...

मोठे प्रकल्प, उपलब्ध जलसाठा व टक्केवारी यानुसार (आकडेवारी दशलक्ष घनमीटरमध्ये)

१) पांझरा - १०.६९ ३०

२) मालनगाव - ४.५८ ४०

३) जामखेडी - ४.२७ ३५

४) कनोली - ०.८५ १०

५) बुराई - ३.७५ २४

६) करवंद - ७.७८ ३२

७) अनेर - ३२.६९ ६६

८) सोनवद - १.१५ ८

९) अमरावती- २.९० १४

१०) सुलवाडे- ४२.७५ ६७

११) अक्कलपाडा - २७.९९ ३२

१२) वाडीशेवाडी - १४.८३ ४४

एकूण मध्यम प्रकल्पात - १५१.८४ ४१

एकूण लघु प्रकल्पात - ३०.९६ २५

एकूण जलसाठा- १८२.९० ३७

Water scarcity
Dondaicha Market Committee Election : 156 उमेदवारांची माघार, 34 रिंगणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com