Dhule : चिमठाण्याजवळ 4 तास वाहतूक ठप्प!

The overturned truck near the petrol pump and the truck stuck in the site
The overturned truck near the petrol pump and the truck stuck in the siteesakal

चिमठाणे (जि. धुळे) : सोलापूर-अंकलेश्रवर राज्य महामार्गावर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ गुरुवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास सोनगीरकडे जाणारा मालवाहतूक ट्रक रस्त्यावर उलटला, तर सोनगीरकडेच जाणारा दुसरा मालवाहतूक ट्रक रिमझिम पावसामुळे रस्त्याच्या साईटपट्टीवर फसल्याने दोंडाईचा व सोनगीरकडे जाणारी वाहतूक चार तास ठप्प झाली होती. चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. (4 hour traffic jam near Chimthane Dhule Latest Marathi News)

गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सोनगीरकडे मालवाहतूक ट्रक (जीजे १२, बीके ५०३४) चिमठाणे गावाजवळील श्री पेडकाईदेवी पेट्रोलपंपजवळ रस्त्यावर चालकाच्या दिशेला उलटला. ट्रकचा चालक व क्लीनर काच फोडून सुखरूप बाहेर निघाले.

थोड्याच वेळात सोनगीरकडेच जाणारा मालवाहतूक ट्रक (आरजे ३९, जीए ०७६८) रिमझिम पावसामुळे रस्त्याच्या साईटपट्टीवर फसला. यामुळे दोघी कडील वाहतूक चार तास ठप्प झाली होती.

शिंदखेडामार्गे वाहतूक वळवली

या अपघातामुळे दोघीकडे दोन- दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील भाबड यांनी चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेसिंग चव्हाण, कर्मचारी मयूर थोरात व होमगार्ड हेमंत पाटील यांना वाहतूक सुरळीत करण्याचा आदेश दिले.

The overturned truck near the petrol pump and the truck stuck in the site
Nashik : वीज कंपनीला अखेर 'तो' बिघाड सापडला

सोनगीरकडून येणारे वाहने चिमठाणे चौफुलीवर शिंदखेडामार्गे वळविण्यात आले. दोंडाईचाकडून येणारे वाहने हातनूरमार्गे अलाणे फाट्यावरून चिमठाणेकडून सोनगीरकडे वाहतूक वळविण्यात आली होती.

जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने ट्रक काढले बाहेर

साईटपट्टीत फसलेल्याला ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर काढण्यात आला, तर उलटलेल्या ट्रकला दुपारी चारच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने सरळ करण्यात आला. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात उशीरापर्यत अपघाताची नोंद करण्यात आली नव्हती.

The overturned truck near the petrol pump and the truck stuck in the site
Nashik Crime : बिबट कातडी विक्रीचा डाव उघड; 2 संशयित जेरबंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com