Nandurbar News : गायीच्या पोटातून काढले 40 किलो प्लॅस्टिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

40 kg plastic remove

Nandurbar News : गायीच्या पोटातून काढले 40 किलो प्लॅस्टिक

पुरुषोत्तमनगर (जि. नंदुरबार) : संकल्प ग्रुप शहादा व पशुसंवर्धन विभाग शहादा यांच्याकडून मोकाट फिरणाऱ्या गायीवर (Cow) शस्त्र क्रिया करून पोटातून ४० किलो प्लॅस्टिक बाहेर

काढून तिचा जीव वाचविण्यात आला. (40 kg of plastic removed by surgery from cows stomach nandurbar news)

शहादा येथील सोनार गल्लीमधील अल्पेश सोनार यांच्या घराच्या पाठीमागे मोकाट फिरणारी गाय आजारी असल्याचा कॉल संकल्प ग्रुपचे सदस्य शिवपाल जांगिड यांना आला. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी गायीची पाहणी केली व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून गायीवर इलाज करण्याचे नियोजन केले.

त्यानुसार गायीच्या पोटात काहीतरी असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. गायीवर शस्त्रक्रिया करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. संकल्प ग्रुपची टीम व डॉ. संजित धामणकर यांच्यासह देवेंद्र देवरे, ओंकार राठोड व केतू चकणे, अल्पेश सोनार, प्रदीप सामुद्रे, संकल्प ग्रुपचे

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सदस्य शिवपाल जांगिड, प्रशांत कदम, ललित पाटील, स्वरूप लुंक्कड, प्रमोद मोरे यांच्या उपस्थितीत गायीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गायीच्या पोटातून सुमारे ४० किलो प्लॅस्टिक काढण्यात डॉक्टरांना यश आले.

शस्त्रक्रियेनंतर गायीला औषधोपचार करून सोडण्यात आले. औषधोपचारासाठी शिवम मेडिकलचे संचालक विजय चव्हाण व प्रवीण मेडिकलचे संचालक राकेश बोरा यांचे सहकार्य लाभले. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, तसेच पिशव्या बाहेर टाकू नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग व संकल्प ग्रुप यांच्याकडून करण्यात आले.

टॅग्स :NandurbarCowplastic