
Nashik Crime News : 2 दुचाकी, 26 गोवंशसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त
मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील दरेगाव शिवारात शफिक पार्क येथील मोकळ्या जागेच्या काटेरी झाडाझुडपांत सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या विशेष पथकाने छापा टाकून दोन दुचाकी, २६ गोवंशसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त केला. (2 two wheelers 26 cows along with three and half lakhs seized Nashik Crime News)
सोमवारी (ता. २०) पहाटे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संधू यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलिस शिपाई दिनेश शेरावते, प्रशांत बागुल, सचिन बेदाडे यांनी पवार वाडीचे पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील, उपनिरीक्षक राउत, शेख व सहकाऱ्यांसह दरेगाव शिवारात छापा टाकून ही कारवाई केली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
शफीक पार्कजवळील मोकळ्या जागेत शाहरूख फैजुल्ला खान, सैय्यद राशिद सैय्यद इस्माईल, मोसीन शेख निहाल, अरशद, वसीम, कलीम व फारूख मेंबर (सर्व रा. कमालपुरा) यांनी बेकायदा कत्तलीच्या इराद्याने २६ गोवंश जातीचे जनावरे दोरीच्या सहायाने निर्दयतेने जखडुन बांधुन ठेवले होते.
येथून पोलिसांनी दोन दुचाकींसह २६ गोवंश असा ३ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.