कापडणे- उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी उघड्यावर अथवा रस्त्यावर औषधी वनस्पती विक्रेते आढळतात. त्यांच्याकडील औषधी वनस्पतींवर संशोधन करण्याची जिज्ञासा खानदेशातील वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकांमध्ये निर्माण झाली अन् त्यांचे संशोधन आणि अथक प्रयत्नांतून ४४४ औषधी वनस्पती आढळून आल्या. त्यांचा आढळ आणि उपयोग त्यांनी पुस्तकात मांडला. त्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नाशिक येथे झाले.