
Dhule Balaji Rathotsav : येथील रथ-पालखी उत्सवात रविवारी (ता. २९) दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातला श्रीराम बालाजी मंदिरातून श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा करून पालखी मिरवणुकीस सुरवात झाली. खेड्यापाड्यावरील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी व यात्रेत भाविकांनी अलोट गर्दी केली.
दोन दिवसांत लाखावर भाविकांनी दर्शन घेतले.( 50 thousand devotees took darshan of Shri Balaji Palkhi Utsav dhule news)
भक्तांना श्रींचे जवळून दर्शन घेता यावे म्हणून कोजागरी पौर्णिमेला असणाऱ्या रथोत्सवानंतर बालाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. पालखी मिरवणुकीस रविवारी सायंकाळी सातला सुरवात झाली. भजनी मंडळ, वाद्य, वाजंत्री, ढोल-ताशांच्या गजरात पालखी उत्सवास सुरवात झाली.
पालखीस झेंडूसह विविध फुलांनी सजविले होते. आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. पालखी मिरवणुकीत विविध वेशभूषा धारण केलेले वहन आणि या वर्षी पालखी मिरवणुकीत पिंपळनेर येथील आदिवासी नृत्य, शिवपार्वती, राम, लक्ष्मण, सीता यांचे सजीव देखावे आकर्षण ठरत होते.
पालखी मिरवणुकीत भोई पंचमंडळाची जबाबदारी असते. भोई पंचमंडळचे अशोक मोरे, हिरालाल मोरे सुनील वाडिले, भिला मोरे, आसाराम तमखाने, महेंद्र वाडिले, अजय तमखाने, बापू साठे, दगडू मोरे, विकी तमखाने, राकेश ढोले, विजय तमखाने, नाना तमखाने, राहुल तमखाने सहकार्य करत होते.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. पालखी मिरवणुकीची जबाबदारी भोई पंचमंडळावर होती. पंचमंडळ, सेवेकरी यांनी जबाबदारी पार पडली. परिसरातील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पालखीतील बालाजी महाराजांची आरती व केळीचा नैवेद्य प्रत्येक घरातील भाविक करत होते.
‘व्यंकट रमणा गोविंदा, जगतपालका गोविंदा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमत होता. रात्री भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत होती. विविध देवदेवतांच्या वेशभूषेत असलेले वहन व सजीव देखाव्याचे सदरीकरण आकर्षक होते. बालगोपाल भजनी मंडळाचा सहभाग विशेष होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.