Dhule Crime News : 6 लाखांची प्रतिबंधित सुगंधित सुपारी पकडली; सोनगीर पोलिसांची कारवाई

seized container
seized containeresakal
Updated on

Dhule Crime News : मुंबई-आग्रा महामार्गावर राज्यात प्रतिबंधित सुगंधित सुपारी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला गुरुवारी (ता. ६) रात्री अडीचला पकडून साडेसहा लाखांचा गुटखा व दहा लाखांचे वाहन येथील पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. (6 lakh of prohibited scented betel nut seized dhule crime news)

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टोलप्लाझावर सापळा रचला असता संशयित कंटेनर (एमएच १३, डीक्यू ३२४०)ला थांबविले. तपासणी केली असता इतर मालाच्या मागे सहा लाख ४० हजार ८०० रुपये किमतीचे व राज्यात खरेदी-विक्री व साठा करण्यास प्रतिबंधित असलेल्या सुगंधित सुपारीच्या ४० गोण्या आढळून आल्या.

मध्य प्रदेशातून हा माल आणला जात होता. चालक शिवाजी गोविंद गवळी (वय ४३, रा. कोलेगाव, पलवा सीटी, डोबवली ता. कल्याण जि.ठाणे) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

seized container
Dhule Crime News : पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला केले ठार मग पतीची आत्महत्या... कुंडाणेमध्ये संशयास्पद घटना

दहा लाखाचा कंटेनरसह १६ लाख ४० हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी किशोर बाविस्कर यांनी फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड पुढील करीत आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, हवालदार संजय देवरे, पोलिस नाईक अमरीश सानप, पोलिस प्रवीण सोनवणे, विजयसिंग पाटील, सुरज सावळे, प्रदिप धिवरे यांनी कारवाई केली.

seized container
Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! ७० वर्षीय आजोबाचा अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com