नाशिक जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त

खंडू मोरे
शनिवार, 12 जानेवारी 2019

नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन ४ फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण जिल्हा 'तंबाखूमुक्त शाळा' करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झंनकर यांनी सांगितले.

नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन ४ फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण जिल्हा 'तंबाखूमुक्त शाळा' करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झंनकर यांनी सांगितले.

नवी पिढी व्यसनमुक्त व आरोग्य संपन्न होण्यासाठी  तंबाखूजन्य पदार्थाचे शालेय परिसरात सेवन न करण्याचा कायदा झाला असून, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळांना आवाहन  करण्यात आले होत़े. जिल्ह्यातील सर्व शाळा  तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या समन्वयकांनी तालुकानिहाय विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मोजक्या शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन तंबाखुमुक्त शाळा करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांना तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी नियमावली व कार्यवाही बाबत मार्गदर्शन केले.  

तंबाखुजन्य पदार्थ शालेय आवारात सेवन न करणे, तंबाखु मुक्त शाळेचा फलक शालेय परिसरात लावणे, विध्यार्थी जाणीव जागृती करणे, तंबाखु नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी, पालकांमध्ये जाणीव जागृती, शाळेत तंबाखु नियंत्रण समिती गठीत करणे, दुष्परिणामाचे शालेय परिसरात पोस्टर्स लावणे, घोषणा, कायद्याची प्रत शालेय स्तरावर ठेवणे, तंबाखुमुक्त शाळेसाठी आरोग्य यंत्रणेची मदत घेणे, उद्बोधन करणे, तंबाखू जंय पदार्थाना शालेय परिसरात विक्रीस बंदी असे नियमावली नुसार निकष पूर्ण करणाऱ्या शाळांनी ऑनलाईन नोंदणी करत शाळा तंबाखूमुक्त शाळा उपक्रमात सहभाग नोंद करू शकतात. 

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११८९ शाळांनी नोंदणी पैकी ६३१ शाळांनी विहित निकषपूर्ण केल्याने पहिल्या टप्प्यात या उपक्रमात तंबाखूमुक्त होण्यात यशस्वी झाल्या आहेत. राहिलेल्या इतर सर्व शाळांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील ३३८८ शाळानी नोंदणी व निकष पूर्ण करत तंबाखूमुक्त शाळाचा जिल्हा घोषित करण्याचा शिक्षण विभागाचा उद्देश आहे. 
तंबाखूमुक्त झालेल्या जिल्ह्यातील शाळा.  

बागलाण--३२ ,चांदवड-२६,देवळा -१५,दिंडोरी -१३८,इगतपुरी -२७,कळवण -६७,मालेगाव -३८,नांदगाव -२६,येवला -२२,नाशिक -३०,निफाड -१३९ ,पेठ -११,सुरगाणा – ३१,सिन्नर -१८,त्रंबकेश्वर -११
जिल्ह्यातील एकूण-६३१ शाळा 

नवी पिढी व्यसनमुक्त व आरोग्य संपन्न बनवण्यासाठी शिक्षकांनी सामाजिक जाबदारीने  व तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा होण्यासाठी  निकष पूर्ण करत ह्या अभियानात सहभागी व्हावे व ऑनलाईन नोंदणी करत आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा होण्यासाठी प्रयत्न करावेत. 
डॉ वैशाली झणकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी नाशिक. 

आपल्या मुलांचे भवितवय उज्वल रहाण्यासाठी शिक्षक व शाळांनी पुढाकार घेत शिक्षण विभागाच्या तंबाखूमुक्त शाळा ह्या अभियानात सहभाग नोंदवत सहकार्य करावे. 
विवेक वाबळे,समन्वयक सलाम मुंबई फाउंडेशन
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 631 schools in Nashik district are tobacco-free