kissan
kissanesakal

PM Kisan Samman Yojana : किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी येथे करा E KYC

Dhule News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील जिल्ह्यातील लाभार्थ्याची ऑनलाइन केवायसी प्रक्रिया ८० टक्के लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे. (80 percent of beneficiaries complete online KYC process of beneficiary in district dhule news)

अद्याप जिल्ह्यातील २० टक्के लाभार्थ्यांची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ईकेवायसी प्रक्रिया ऑनलाइन करून घ्यावी अन्यथा ईकेवायसीअभावी या योजनेच्या पुढील लाभापासून वंचित राहावे लागेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

kissan
Vegetable Rate Hike : उन्हाच्या तडाख्याने पालेभाज्या महागल्या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ३९ या अॅपमध्ये ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वतः ईकेवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल.

तसेच ग्राहक सेवा केंद्रावर (CSC) नाममात्र शुल्कात ईकेवायसी बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी कळविले आहे.

kissan
RTE Admission : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदा तिपटीहून अधिक अर्ज प्राप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com