धुळे- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत विशेष रेल्वे जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्रीरामच्या गजरात रवाना झाली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात केली.