शिंदखेडा- शिंदखेडा नगरपंचायतीचा २०२५-२६ या वर्षाचा ८२ कोटी ४९ लाख ६३ हजार २३५ रुपयांचा अर्थसंकल्प मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पास प्रशासक पंकज पवार यांनी मान्यता प्रदान केली..अंदाजपत्रकात विविध विकासकामांच्या भरीव तरतुदींसह दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, दुर्बल घटकासह क्रीडा क्षेत्रासाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजना राबवणे, भुयारी गटार, प्रादेशिक पर्यटन विकास योजना राबविणे, पंतप्रधान आवास योजने राबवणे, रमाई आवास योजना राबवणे, उद्यानाचे सुशोभीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे, ओपन जिम, काँक्रिटचे रस्ते तयार करणे ही यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, क्रीडा क्षेत्र व दुर्बल घटकासाठी प्रत्येकी ५ टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे..अर्थसंकल्पीय जमा-खर्चाचा तपशीलआरंभाची शिल्लक : १५ कोटी ३५ लाख १० हजार ४४७ रुपयेमहसुली जमा : पाच कोटी ३५ लाख ५ हजार रुपयेभांडवली जमा : ६१ कोटी ७९ लाख ४७ हजार ३८८ रुपये.खर्चमहसुली खर्च : सहा कोटी १२ लाख २ हजार ६५० रुपयेभांडवली खर्च : ७६ कोटी ३५ लाख २५ हजार २७९ रुपयेशिल्लक जमा खर्च : दोन लाख ३५ हजार तीनशे सहा रुपये.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.