Dhule Crime News : ड्रंक अँड ड्राइव्ह’चे 91 गुन्हे; पोलिसांची नाकाबंदी

सरत्या वर्षाला निरोप देताना पोलिसांनी नाकाबंदीतून कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी केली.
Confiscated pistol
Confiscated pistolesakal

Dhule Crime News : सरत्या वर्षाला निरोप देताना पोलिसांनी नाकाबंदीतून कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी केली.

यात ड्रंक अँड ड्राइव्हचे ९१ गुन्हे दाखल केले, तर पिस्टल, गुटखा, मद्यसाठाही जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.( 91 cases of drunk and drive Police blockade Dhule Crime News)

श्री. धिवरे यांच्यासह ४० पोलिस अधिकारी, १७८ अंमलदारांच्या फौजफाट्याने जिल्ह्यातील ३३ ठिकाणी नाकाबंदी केली. यात पोलिसांनी सुमारे साडेबारा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्री. धिवरे यांनी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली. यादृष्टीने त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्यांचे अधिकारी, शाखा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या.

पोलिसांनी ३३ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत ७२४ चारचाकी आणि ४७३ दुचाकी वाहनांची तपासणी केली. मोटार वाहन कायद्याचा वापर करत ११७ गुन्हे व त्यातून सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वाहनधारकांना ठोठावला.

शिरपूर शहर पोलिसांनी नाकाबंदीत पाच जिवंत काडतुसांसह दोन गावठी पिस्टल जप्त केल्या. यात ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दारूबंदी कायद्यान्वये ९९ गुन्हे दाखल करून एक लाख ६१ हजार ३२५ रुपयांचा मद्यसाठा ताब्यात घेतला.

Confiscated pistol
Crime News: अर्जुन पुरस्कारप्राप्त पंजाब डीएसपीची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह

जुगाऱ्यांवरही कारवाई करीत १९ गुन्हे दाखल केले. त्यात रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ११ हजार ७० रुपयांचा ऐवज जप्त केला. सोनगीर पोलिसांनी दोन लाख २४ हजार ६४० किमतीचा गुटखा जप्त केला.

रात्रीतून एकूण ३२८ कायदेशीर कारवाया आणि त्यात १२ लाख ५४ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नाकाबंदीदरम्यान पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, उपअधीक्षक साजन सोनवणे यांनी ही मोहीम राबविली.

Confiscated pistol
Nashik Fraud Crime: बिनव्याजी कर्ज देणाऱ्या बालाजी फायनान्सकडून फसवणूक! संचालकांसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com