Dhule News : अरे व्वा..! केवळ 5 टक्के काम बाकी; एप्रिलअखेर जलवाहिनीची चाचणी

Mayor Pratibha Chaudhary inspecting Akkalpada water supply scheme for Dhule city water supply. Neighboring Commissioner Devidas Tekale
Mayor Pratibha Chaudhary inspecting Akkalpada water supply scheme for Dhule city water supply. Neighboring Commissioner Devidas Tekaleesakal

Dhule News : शहराला वरदायिनी ठरणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या योजनेच्या पाहणी दौऱ्यातून पुढे आली आहे. (95 percent of Akkalpada Water Supply Scheme work has been completed dhule news)

त्यामुळे एप्रिलअखेर चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. महापालिका, एमजेपी व ठेकेदारांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणी दौऱ्यातील या नव्या दाव्यावर विश्‍वास ठेवून योजना लवकरच कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.

धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची महापौर प्रतिभा चौधरी यांनी मंगळवारी (ता. १८) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, महापालिकेचे शहर अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकुम, उपअभियंता धोत्रे, उपकार्यकारी अभियंता आर. सी. पाटील, उपअभियंता बहादुरे, ठेकेदार व ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असून, येत्या काही दिवसांतच या योजनेच्या कामाची चाचणी घेऊन योजनेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. योजनेच्या प्रगतीबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. दरम्यान, महापौर श्रीमती चौधरी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष कामाची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीने पाहणी केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Mayor Pratibha Chaudhary inspecting Akkalpada water supply scheme for Dhule city water supply. Neighboring Commissioner Devidas Tekale
Dhule News : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रभूषण परत करावा : महेश घुगे

योजनेद्वारे धुळेकरांना लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या दैनंदिन कामाचा आढावा देऊन उर्वरित कामांचा कृती आराखडा तयार करावा व त्यानुसार काम पूर्ण करावे, असा आदेश महापौर श्रीमती चौधरी यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदारांना दिला.

कामाची प्रगती अशी

योजनेंतर्गत ॲप्रोच चॅनल, ट्विन जॅकवेल, ॲप्रोच ब्रिज, संरक्षण भिंत आदी कामे पूर्ण झाली आहेत. अशुद्ध पाणी उद्धरण नलिका, शुद्ध पाणी गुरुत्ववाहिनी, जलशुद्धीकरण केंद्राचे ९५ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. अक्कलपाडा योजनेवर आवश्यक ते २०० एचपीचे पाच पंपसेट जॅकवेलवर आले असून, उभारणीचे काम सुरू आहे.

तसेच जॅकवेल पंपहाउस येथे मेन हेडर व व्हॉल्व्ह, असेंब्ली उभारणीचे काम सुरू आहे. अक्कलपाडा येथे महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा व वीजजोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूणच योजनेचे सुमारे ९५ टक्के काम पूर्णत्वास आले असून, एप्रिलअखेर योजनेंतर्गत सुमारे ४४ किलोमीटर पाइपलाइनची चाचणी घेण्यात येणार आहे. साधारण दहा ते बारा दिवसांत संपूर्ण चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

Mayor Pratibha Chaudhary inspecting Akkalpada water supply scheme for Dhule city water supply. Neighboring Commissioner Devidas Tekale
Chhagan Bhujbal : ‘पाणी पुरवठा़’चा पदभार प्रभारींकडे नको : भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com