Dhule News : म्हसदीत भजनात तल्लीन देवरे यांच्या अकाली एक्झिटने परिसरात हळहळ

Abasaheb Devre
Abasaheb Devreesakal

म्हसदी (जि. धुळे) : ‘झाले बदनाम देवा तुझ्या पायी... चित्त संसारी लागत नाही!’ ही अखेरची गवळण येथील प्रौढ भजनीच्या आयुष्याची अखेरची ठरली. रात्री उशिरापर्यंत भजनात तल्लीन पांडुरंगाच्या प्रौढ भक्ताचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (abasaheb Devre premature exit between Bhajan in Mhasadi Dhule News)

येथील प्रौढ आबासाहेब बुधाजी देवरे (वय ६०) यांचे रात्री उशिरा हृदयविकाराने निधन झाले. राजे संभाजी भंजनी मित्रमंडळास प्रोत्साहन देणाऱ्या दिलदार मित्राच्या अकाली एक्झिटमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली झाली. येथील आबासाहेब देवरे गुरुवारी रात्री (ता. १५) उशिरापर्यंत मित्रांच्या संगतीत भजनात तल्लीन होऊन अभंग, पाळणा, भक्तिगीते आणि गवळणी सादर करत होते.

भक्तिमय भजन, संगीताचा कार्यक्रम संपल्यावर देवरे यांना हृदयविकाराचा झटका आला. सोबतच्या सर्व सवंगड्यांनी शर्थीचे प्रयत्नही केले. उपचारासाठी धुळे येथे खासगी रुग्णालयात हलविलेदेखील; परंतु नियतीपुढे कोणाचेही काहीच चालत नाही, या न्यायाने रस्त्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांचा लहान मुलगा विकास याचा वाढदिवस होता. तो दिवस त्यांच्या कुटुंबाच्या कायम स्मरणात राहणारा आहे.

Abasaheb Devre
Vijay Karanjkar | गद्दार, दलालांना निवडणुकीत भुईसपाट करू : विजय करंजकर यांचा हल्लाबोल

युवकांना लावले भक्तिमार्गावर

साईबाबांची पदयात्रा असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम आबासाहेब देवरे यांची हमखास हजेरी. ईश्वरभक्तीचे जणू त्यांना वेडच. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासह अन्य ज्येष्ठ मित्रांनी नवीन राजे संभाजी भजनी‌ मित्रमंडळास उभारी देण्याचे काम हाती घेतले आहे. राजे संभाजी भजनी मंडळात सुमारे तीस युवकांचा समावेश आहे.

शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर म्हसदीत अंत्यसंस्कार‌ करण्यात आले. खासगी वाहनचालक संजय बुधाजी देवरे यांचे ते मोठे बंधू, तर राहुल देवरे, विकास देवरे यांचे वडील होत.

Abasaheb Devre
Knowledge Fest Design : IIIDतर्फे 3 दिवसीय नॉलेज फेस्ट डिझाईनचे आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com