Abhay Yojana : दोन मोबाईल टॉवर, एक गाळा सील; मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The action team of the Municipal Corporation while sealing the mobile tower and the coal due to non-payment of dues.

Abhay Yojana : दोन मोबाईल टॉवर, एक गाळा सील; मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने कारवाई

धुळे : मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा बजावून, शास्तीमाफीचा लाभ देऊनही संबंधितांनी थकबाकी (Arrears) अदा न केल्याने महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. (abhay yojana 2 mobile towers on sediment seal Action for non payment of property tax arrears dhule news)

सोमवारी (ता. १३) कारवाई पथकाने शहरात दोन मोबाईल टॉवर, एक गाळा सील केला. दरम्यान, महापालिकेकडून झोपडपट्टी भागातील थकबाकीदारांवर कारवाई केली जात नव्हती, मात्र अशा थकबाकीदारांवरही आता कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. त्यानुसार एका थकबाकीदाराकडील नळ कनेक्शन तोडण्यात आले.

मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकीदारांना वारंवार संधी देऊनही अनेक जण थकबाकी भरत नसल्याचे चित्र आहे. थकबाकीदारांसाठी शंभर टक्के शास्तीमाफीची योजनाही राबविण्यात आली. या योजनेचा बऱ्याच थकबाकीदारांनी लाभही घेतला.

मात्र अनेक थकबाकीदार अशी संधी देऊनही पुढे आले नाहीत. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर आता महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात मोबाईल टॉवर कंपन्या, गाळेधारकांसह इतर थकबाकीदारांचा समावेश आहे. सोमवारी कारवाई पथकाने जयहिंद कॉलनी येथे मोबाईल टॉवर सील केला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

संबंधित टॉवर व्हिजन कंपनीकडे तीन लाख १५ हजार ५०८ रुपये बाकी होती. ही थकबाकी संबंधित कंपनीने अदा न केल्याने पथकाने टॉवर सील केला. तसेच शहरातील स्टेशन रोडवरील राठी हॉस्पिटल येथे एटीसी कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. संबंधित कंपनीने थकीत पाच लाख ९१ हजार ४९६ रुपये थकबाकी अदा न केल्याने पथकाने हा टॉवरही सील केला.

गाळे सील, नळ कनेक्शन तोडले

कारवाई पथकाने साक्री रोडवरील चंपाबाग येथे ए. एफ. हुसेनी भोगवटदार चौधरी यांच्याकडे एक लाख २३ हजार रुपये थकबाकी आहे. ती त्यांनी न भरल्याने पथकाने गाळे सील केले. दरम्यान, आतापर्यंत महापालिकेकडून झोपडपट्टी भागातील थकबाकीदांवर कारवाईचा बडगा उगारलेला नव्हता.

मात्र, शंभर टक्के शास्तीमाफी देऊनही या भागातील थकबाकीदार थकबाकी अदा करत नसल्याने त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उचण्यात आला आहे. यात सोमवारी (ता. १३) शहरातील आझादनगर भागात एका थकबाकीदाराचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, मनोज चिलंदे, अजय देवरे, अशोक चौधरी यांच्या पथकाने या कारवाया केल्या.

टॅग्स :DhuleArrearsAbhay yojana