धुळे- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने २००४ पासून शाळांमधून शैक्षणिक साहित्य विक्रीस बंदी घातली आहे, असे असतानाही अनेक खासगी शैक्षणिक संस्थांमधून अद्यापही साहित्य विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आता संबंधित संस्थांना स्पष्ट आदेश देत विक्री थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.