चाळीसगाव भडगाव रसत्यावर ट्रक व कारचा अपघात

प्रमोद पवार 
सोमवार, 19 मार्च 2018

कजगाव (ता. भडगाव) : येथून जवळ असलेल्या तांदुळवाडी फाट्याजवळ कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज  दुपारी तीनच्या सुमारास घडली. 

चाळीसगाव येथून पाचोऱ्याकडे जाणारी टाटा झेट कार (क्रमांक एम एच 19 सी यू  4035) या कारने समोरून येणारा ट्रक क्रमांक (एम एच 30- 4590) याला जोरदार धडक दिली. या कारमधील विलास सुरसिंग पाटील (वय 30) रा. पाचोरा (जि.जळगाव) यांचा पाय व कंबरेला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आपघातग्रस्तंना गाडीतून बाहेर काढले.

या अपघात कारचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी गंभीर तरूण विलास पाटील याला ग्रामस्थांनी पाचोरा येथील निरामय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची भडगाव पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी पर्यंत नोंद झालेली नव्हती.

Web Title: Accident at chalisgao bhadgao road between truck and car