ओव्हरटेक करतांना अचानक समोर आला डिव्हायडर; पण दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

ओव्हरटेक करतांना अचानक समोर आला डिव्हायडर; पण दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

शहादा ः  शहादा प्रकाशा बायपास रस्त्यावर शहरालगत हिरो शोरूम समोर नव्याने तयार करण्यात आलेल्या डिव्हायडरवर ट्रक ट्राला घुसून ट्रकचे नुकसान झाले.अपघातावेळी प्रसंगावधान साधून चालकाने वाहनास ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बुधवारी पहाटे पाच साडेपाच वाजेच्या सुमारास घटना घडली.

अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठिक ठिकाणी सुरू आहे. यातच प्रकाशा- खेतिया- शहादा बायपास रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे.त्यात शहादा बायपास प्रकाशा व शहरात प्रवेशद्वाराजवळ डिव्हायडर नुकतेच तयार करण्यात आले असून मंगळवारी या डिव्हायडर वर सफेद रंग मारण्यात आला आहे. शहरालगत असलेल्या हिरो मोटरसायकल शोरूम च्या समोरचा रस्त्यावर बुधवारी पहाटे पाच साडे पाच च्या दरम्यान रेती भरण्याकरिता मनमाड कडून प्रकाशाकडेे जाणारा 14 चाकी ट्रॉला वाहन क्रमांक (एम. एच.14 ए. यु.8587) हा जात असताना चालक वाहनांंना ओव्हरटेक करीत असताना समोर डिव्हायडर न दिसल्यामुळे वाहनांची दोघी चाके डिव्हायडर वर चढल्याने मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाहन चालकाने प्रसंगावधान साधून वाहनावर ताबा मिळवल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली. 

दुभाजकाचे काम चुकीचे ?

या रस्त्याचे काम उत्तम प्रतीचे असले तरी ठेकेदाराने केलेले डिव्हायडर हे चुकीच्या मार्गाचे असल्याचे जड वाहन चालकांचे म्हणणे आहे .रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदारांच्या सोयीनुसार ठीक ठिकाणी मार्किंग केली नसल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड जात आहे .शासनाच्या नियमानुसार डिव्हायडरला असलेला रंग रात्री-बेरात्री वाहनचालकांना डिव्हायडर लांबूनच दिसला पाहिजे अशी स्थिती अगोदरच तयार करणे गरजेचे असते.त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टळतात. मात्र संबंधित रस्ता ठेकेदारांकडून रेडियम न लावल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. भविष्यात यापेक्षा मोठा अपघात घडू नये म्हणून ठेकेदाराने डिव्हायडरवर रंग व रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसेल असा कलर अथवा रेडियम लावण्यात मागणी होत आहे.

 रेडीयम लावणे आवश्यक
"डिव्हायडरच्या ठिकाणी मुख्य भागावर चमकनारे रेडियम लावल्यास वाहनचालकाला शंभर-दोनशे फुट अंतरावरून निदर्शनास येते. त्यामुळे वाहन चालक वाहन मर्यादित ठेवून अपघात टाळत असतो मात्र या ठिकाणी कुठल्याही वाहनचालकांना न दिसणाऱ्या पट्ट्यामुळे हा अपघात झाला आहे."

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com