Nylon Manja : मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई; 3 हजारांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nylon Manja

Nylon Manja : मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई; 3 हजारांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यासह भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद लहानांपासून थोरल्यांपर्यत सर्वच नागरिक घेतात. जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पतंग व मांजा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जीवितास संरक्षण करण्याची गरज आहे. अशा दुर्मिळ होत असलेल्या पक्षांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करू नये तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा नंदुरबार पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: Nandurbar News : मोकाट जनावरे, कुत्र्यांच्या झुंडीने ग्रामस्थ त्रस्त

पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे, की पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशू, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होऊन आपला जीव देखील गमवावा लागला आहे, असे अनेक उदाहरण पाहायला मिळतात.

नंदुरबार बाजार परिसरात डॉ. शर्मा यांच्या हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या बोळीत एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा/दोऱ्यांची विक्री करीत आहे, असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता जळका बाजार परिसरात डॉ. शर्मा यांच्या हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या बोळीत एक इसम त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन असलेला नायलॉन मांजाची विक्री करीत असताना आढळला. त्यास ताब्यात घेण्यात आले.

नाव विचारले असता नितीन प्रकाश छत्रिय (वय-४२ रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) असे सांगितले. त्याच्याकडून तीन हजार १२० रुपये किमतीचे ६ नग नायलॉन मांजा आढळला, त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Nandurbar News : गटारावरील तुटलेला स्लॅब ठरतोय डोकेदुखी

पतंग उडविताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवितहानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक महेश माळी, पोलिस हवालदार सुनील मोरे, पोलिस शिपाई श्रीकांत पाटील, शैलेंद्र माळी, राहुल पांढारकर, अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Nandurbarchinese manja