Latest Marathi News | गटारावरील तुटलेला स्लॅब ठरतोय डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taloda : An open drain without a slab in the Kalabhairav ​​temple area

Nandurbar News : गटारावरील तुटलेला स्लॅब ठरतोय डोकेदुखी

तळोदा : शहरातील कालभैरव मंदिराजवळ जिल्हा परिषद शाळा क्रमांक नऊसमोर गटारावरील स्लॅब दीड महिन्यापासून काढण्यात आला आहे. तरीदेखील नवीन स्लॅब टाकला जात नसल्याने परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना त्रासाचे ठरत आहे.

त्यामुळे गटारावरील स्लॅब तातडीने टाकण्यात यावा अशी मागणी होत आहे. गटारीतून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी वाहत असते. (Broken slab on drain is Make disturbance for students and farmer in nandurbar city Nandurbar News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nandurbar News : विकास आराखड्याचे दोन्ही विषय नामंजूर

गटार तुंबल्याने गटाराचे पाणी रस्त्यावरही पसरते. दुरुस्ती व गटार साफ करण्यासाठी गटारावरील संपूर्ण स्लॅब काढून टाकण्यात आला होता.

मात्र स्लॅब काढून दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीदेखील येथे नवीन स्लॅब टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेत शिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Nashik News : हजार किलोमीटरचा प्रवास करीत ते निघालेत अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी!