अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या मुख्याध्यापकावर बडतर्फीची कारवाई

Court
CourtSakal
Summary

सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप ठाकरे पुढील तपास करीत आहेत. लवकरच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ यांनी सांगितले.

निजामपूर (धुळे) : उडाणे येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी (Minor girl) शेतातच गुपचूप बालविवाह (Child marriage) करून कायदा पायदळी तुडविणाऱ्या हट्टी खुर्द (ता.साक्री) येथील 'त्या' पराक्रमी मुख्याध्यापकाला अखेर संस्थेने बडतर्फ केले. हट्टी खुर्द येथील ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात (Police Station) संशयित शिक्षकासह अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांविरुद्ध 26 एप्रिलला गुन्हा दाखल (Filed a crime) झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कठोर कारवाई करण्यात आली. (action against the headmaster who married a minor girl)

दरम्यान बलवंड (ता.जि.नंदुरबार) येथील रामगोविंद बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांसह संचालक मंडळाच्या 1 मे रोजी झालेल्या बैठकीत पारित केलेल्या ठरावानुसार संबंधित शिक्षकास संस्थेने 3 मे पासून बडतर्फ केले असून संस्थेने नंदुरबारच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे बडतर्फीचा अहवालही सादर केला आहे. संबंधित शिक्षकावर यापूर्वीही सन 2018 मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचेही संस्थेने बडतर्फीच्या आदेशात नमूद केल्याचे समजते. याबाबत आता शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Court
कृषी सेवा केंद्रासह उत्पादन व वाहतुकीस परवानगी; धुळे जिल्‍हाधिकारींचे आदेश

ग्रामसेवक विजय बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देविदास पदमोर (रा.हट्टी खुर्द), अशोक हालगीर व लताबाई हालगीर (रा.उडाणे ता.धुळे) ह्या तिन्ही संशयितांनी 2 मार्चला कोणासही काही खबर न लागू देता संगनमताने शेतातच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गुपचूप विवाह लावून दिला होता. संबंधित अल्पवयीन मुलीची जन्मतारीख 2 एप्रिल 2004 असून ती शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या परिपक्व नसतानाही तिचा बेकायदेशीर बालविवाह लावण्यात आला. दरम्यान तिन्ही संशयित सद्या जामिनावर आहेत.

वास्तविक ज्याच्याशी बालविवाह लावण्यात आला तो 40 वर्षीय संशयित हा नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथील एका अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. एवढ्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असूनही संशयित मुख्याध्यापक हा 17वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह करण्यास तयार झालाच कसा? याबाबत माळमाथा परिसरातून आश्चर्य व्यक्त झाले. सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप ठाकरे पुढील तपास करीत आहेत. लवकरच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ यांनी सांगितले.

(action against the headmaster who married a minor girl)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com