चाळीसगाव : लाच मागणाऱ्या दोन पोलिसांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

दोघा पोलिसांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाने कारवाई केली. 

चाळीसगाव : गांजाची केस दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून आठ हजारांची लाच मागणाऱ्या येथील दोघा पोलिसांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाने कारवाई केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे कामावर असलेल्या इसमावर गांज्याची केस दाखल न करण्याची सबब करुन त्या मोबदल्यात येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी बापुराव फकीरा भोसले (वय 52) व गोपाल गोरख बेलदार (वय 31) यांनी दिनांक तक्रारदाराच्या मार्फत पंचासमक्ष 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तडजोडीअंती 8 हजार रुपये मागितले. लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून दोन्ही पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव यांच्याश रविंद्र माळी, सुनिल पाटील, सुरेश पाटील, मनोज जोशी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken against two policemen for soliciting bribe at chalisgaon