Dhule News : मनपाचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांची बदली; आजच पदभार स्वीकारण्याचा आदेश

Nitin Kapadnis
Nitin Kapadnisesakal

Dhule News : येथील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांची नंदुरबार येथे सहआयुक्त (जिल्हा प्रशासन अधिकारी, गट-अ) या पदावर बदली झाली. श्री. कापडणीस यांना ३१ मे २०२३ पासूनच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

येथील महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री. कापडणीस गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान, बुधवारी (ता. ३१) त्यांच्या बदलीचा आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून काढण्यात आला. (Additional Municipal Commissioner Replacement of Nitin Kapadnis Order to take charge today Dhule News)

मुख्याधिकारी गट- अ (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने ही बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. नंदुरबार येथे सहआयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी गट-अ या रिक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली.

श्री. कापडणीस यांना ३१ मे २०२३ पासून त्यांच्या सध्याच्या येथील अतिरिक्त आयुक्तपदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे तसेच पदस्थापना झालेल्या ठिकाणी अर्थात नंदुरबार येथे उद्याच (ता. १) त्यांनी रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास तत्काळ सादर करावा, असेही बदली आदेशात नमूद आहे. श्री. कापडणीस यांच्या बदलीमुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nitin Kapadnis
Nashik News : अध्यात्माकडून कर्माकडे वाटचाल करणारा सिन्नर तालुका : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

निबंध लिहिणारे अधिकारी?

येथील महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांच्या फायलींवर विविध शेरे मारून कामे अडविण्याचा आरोप श्री. कापडणीस यांच्यावर अनेक नगरसेवकांकडून झाल्याचे पाहायला मिळाले.

फायलींवर निबंध लिहिणारे अधिकारी अशीही त्यांची ओळख नगरसेवकांकडून निर्माण करण्यात आली. आता शेवटच्या काही दिवसांत कचरा संकलनाचा प्रश्‍न, स्वच्छतेसह इतर कामांसाठी कामगार पुरविणाऱ्या आस्था संस्थेद्वारे झालेला गैरप्रकाराचा आरोप आदी विविध विषयांवरही श्री. कापडणीस यांना विरोधकांनी घेरल्याचे पाहायला मिळाले.

Nitin Kapadnis
Jalgaon News : निंबादेवी धरणात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com