धोंड्याचा महिना आजपासून सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

येवला - दान-धर्मासाठी शुभ असणार्‍या आणि जावईबापूंच्या स्वागताचा अधिक (धोंड्याच्या) महिन्याला उद्या पासुन सुरुवात होत आहे. त्यामुळे धार्मिक उपक्रमासह आंबारस व जावयांना वस्तू भेट देण्याची रेलचेल पुढील महिनाभर असणार आहे.

तीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास पर्वकाळ 'हाय-फाय' जमान्यामध्ये या महिन्याचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही. येथील जेष्ठ नेते अंबादास बनकर यांनी तर या पवित्र महिन्यानिमित्त रामगिरी महाराज यांचा श्रीमदभागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. असेच अनेक कार्यक्रम गावोगावी होणार आहे. 

या महिन्यात जावईबापूंची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. त्यांना सासरी बोलावून सोने, तांबे, चांदीच्या वस्तू दान म्हणून दिल्या जातात. त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण ठेवले जाते. या महिन्याध्ये पुरणाचे दिंड करून मित्रांना वाटले जातात. तसेच पुरणपोळीचे जेवणही दिले जाते. पुरणाच्या दिंडांना ’धोंडा’ असे म्हटले जाते. त्यामुळे हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो.  गेल्या महिन्यातच लग्न झालेल्यांना अधिक महिन्यामुळे सासर्‍याच्या पाहुणचाराची नामी संधी मिळाली आहे.

या महिन्यात हिंदू धर्म पद्धतीनुसार मुली व जावईबापूंना लक्ष्मी नारायणाचा जोडा संबोधला जातो. जावई हा विष्णुचे प्रतीक, तर त्याची पत्नी अर्थात आपली कन्या ही लक्ष्मी समान असल्याने अधिक महिन्यात त्यांचे पूजन केले जाते. त्यांना सन्मान पूर्वक बोलावून अनारसे, बत्तासे, म्हैसूरपाक वड्या, घिवर, नारळ, सुपार्‍या आदी 33 इतक्या संख्येचे चांदी किंवा तांब्याच्या ताटात दिवा लावून, कुंकू लावून हे दान लेक-जावयांना दिले जाते.  त्यामुळे या संपूर्ण अधिकासात घरोघरी जावई, लेकी, भाचे कंपनी यांच्या मान सन्मानाची लगबग सुरु होत असल्याची दिसुन येत आहे.

Web Title: adhik mass starts from today