Dhule Election News : आगामी विविध निवडणुकांसाठी प्रशासकीय पूर्वतयारी सुरू; मतदान केंद्रांची तपासणी

election news
election news esakal

Dhule Election News : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे होते की एकत्रित; या निवडणुका त्यांच्या अवधीतच होतात की लवकर होतील, अशी चर्चा राजकीय आणि जनसामान्यांच्या पातळीवर होत असताना राज्यात सर्वत्र प्रशासकीय पूर्वतयारी मात्र सुरू झाली आहे.

या संदर्भात निवडणूक आयोगाकडून विविध सूचना दिल्या जात असल्याने धुळे जिल्ह्यात एक हजार ६७४ मतदान केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. तहसीलदार आणि सहकारी यंत्रणेच्या माध्यमातून ही तपासणी सुरू आहे. (Administrative preparations for upcoming various elections started dhule news)

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुढील वर्षी अधिकतर मेमध्ये केंद्र सरकार स्थापन झाले पाहिजे. तसेच पुढील वर्षी दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक जाहीर होत असते. शिवाय यंदा डिसेंबरअखेरीस येथील महापालिकेतील भाजपचा सत्ता कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला नव्याने सत्तास्थापनेचा कालावधी असेल. असे असले तरी महापालिका निवडणूक पुढे ढकलली जाण्याची आणि १ जानेवारीपासून प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जाते.

तपासणी पथक कार्यरत

एकीकडे ही स्थिती असताना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारी सुरू झाली आहे. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या पाच विधानसभा मतदारसंघांत मतदान केंद्रांच्या तपासणीला सुरवात झाली आहे.

तहसीलदार, अपर तहसीलदार आणि सहकारी यंत्रणेच्या पथकाकडून एकूण एक हजार ६७४ मतदान केंद्रांची तपासणी केली जात आहे. ज्या वास्तूत म्हणजेच शाळांमध्ये मतदान केंद्र असते तेथील वर्गखोल्यांची नेमकी स्थिती, गळती आहे किंवा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विजेची सुविधा, दिव्यांग मतदार असल्यास आनुषंगिक सुविधा आदी विविध बाबींची तपासणी पथकाकडून सुरू झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

election news
Lok Sabha Election : रावेर लोकसभा एकनाथ खडसेंनी लढवावी; जिल्हा राष्ट्रवादीतर्फे प्रस्ताव

स्थिती जाणण्यावर भर

एका मतदान केंद्राशी सरासरी पंधराशेपर्यंत मतदार जोडलेले असावेत. त्यापेक्षा अधिक मतदार असल्यास ते त्या शाळेतील मतदान केंद्रात दुसऱ्या खोलीतील मतदान केंद्राशी जोडणे आणि याअनुषंगाने आढावा घेण्याचा प्रयत्नही निवडणूक यंत्रणेकडून केला जात आहे. मतदान केंद्राविषयी आवश्‍यक त्या सूचना संबंधित मुख्याध्यापकांना दिल्या जात आहेत.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अपर तहसीलदार विनोद पाटील यांनी मतदान केंद्र राहणाऱ्या विविध शाळांची स्थिती तपासणी सुरू केली आहे, जेणेकरून काही त्रुटी, अडचणी समोर आल्यास त्यावर वेळेत उपाययोजना करण्याचे प्रयत्न निवडणूक यंत्रणेकडून होणार आहेत. याप्रमाणे उर्वरित चारही मतदारसंघांत तपासणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

मतदारसंघ..............मतदान केंद्र..........मतदारसंख्या

०५- साक्री.............३६७.................३,४५,९८९

०६- धुळे ग्रामीण.......३७२.................३,८०,५९७

०७- धुळे शहर.........२६७..................३,२५,५६७

०८- शिंदखेडा..........३३८..................३,२९,०९४

०९- शिरपूर.............३३०..................३,२६,३३९

एकूण....................१६७४.................१७,०७,५८६

अधिकारी इलेक्शन कॉन्फरन्सला...

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे गुरुवार (ता. २२)पासून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीची विशेष इलेक्शन कॉन्फरन्स सुरू झाली आहे. त्यात येथील जिल्हाधिकारी जलज शर्मा, तसेच जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर सहभागी झाले आहेत. ही कॉन्फरन्स शुक्रवारी दुपारपर्यंत असेल. एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पूर्वतयारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्याने आगामी निवडणुका अवधीपेक्षा लवकर होतात किंवा कसे याविषयी उत्कंठा वाढीस लागणार आहे.

election news
Dhule News : आदिवासी बांधवांसाठी महू ठरतोय कल्पवृक्ष! पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात रोजगाराचे साधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com