Dhule News: धगधगत्या ‘हॉकर्स झोन’ मध्ये प्रशासकांची उडी! पांझरा नदीकिनारी रस्त्यावर व्यवसाय थाटण्याचा फतवा

शहरात सतत धगधगणाऱ्या ‘हॉकर्स झोन’च्या गंभीर प्रश्‍नात आता महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी उडी घेतली आहे.
Administrators decision on hawkers zone notice to set up business on Panzra riverside road from tomorrow Dhule News
Administrators decision on hawkers zone notice to set up business on Panzra riverside road from tomorrow Dhule News esakal

Dhule News : मनधरणीचे राजकारण, मतांचा गठ्ठा आणि राजकीय पातळीवर स्वच्छ व सुंदर शहराच्या उद्देशाला छेद दिल्यामुळे शहरात सतत धगधगणाऱ्या ‘हॉकर्स झोन’च्या गंभीर प्रश्‍नात आता महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी उडी घेतली आहे.

त्यांनी वर्दळीच्या संपूर्ण आग्रा रोडवरील हातगाडी व्यावसायिकांना बुधवार (ता. ३)पासून पांझरा नदीकिनारी असलेल्या रस्त्यावर व्यवसाय करण्याचा फतवा काढला आहे.()

या आदेशाचे उल्लंघन केल्यास महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन संयुक्त कारवाईतून हातगाड्या जप्त करतील, असा इशारा प्रशासकांनी दिला आहे. देवपूरमधील नगावबारीपासून ते गांधी पुतळा, आग्रा रोडमार्गे पाचकंदील व तेथून दसेरा मैदान, तसेच राजवाडे मंडळापासून ते दसेरा मैदानापर्यंतचा वर्दळीचा रस्ता हॉकर्सने व्यापला आहे.

दुतर्फा वाहनांचे पार्किंग, त्यात विविध हातगाडी व्यावसायिकांमुळे हे रस्ते कमालीचे डोकेदुखी ठरले आहेत. त्यात बारापत्थर चौकाजवळ तहसील कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

शिवाय देवपूरमधील जीटीपी स्टॉप ते मोठ्या पुलापर्यंतचा रस्ता तर नवीन पाचकंदील म्हणून उदयास येत असल्याची देवपूरवासीयांची भावना झाली आहे. जो-तो व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर दुतर्फा रस्ता व्यापत असल्याने त्याचा इतर नागरिक, वाहनधारकांनाच त्रास सोसावा लागत आहे. शिवाय अनेकांचा जीव धोक्यात येऊ पाहत आहे.

प्रशासकांची योग्य पावले

हॉकर्सच्या अतिक्रमाणामुळे रस्ते चिंचोळे होऊन वाहतुकीचे गंभीर प्रश्‍न निर्माण करीत आहेत. केवळ रस्त्यावरच अतिक्रमण व त्यातूनच व्यवसाय चालतो, असा एक समज शहरात दिसून येतो. ग्राहकांना इतर जागेकडे वळविण्याची तसदी कुणी घेण्यास तयार होत नाही; परंतु महापालिकेच्या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त दगडे-पाटील यांनी जटिल हॉकर्स झोनचा प्रश्‍न सोडवणुकीसाठी यथोचित पावले टाकण्यास सुरवात केली आहे. त्यांनी अनेक धुळेकरांच्या मनातील निर्णय अमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे.

Administrators decision on hawkers zone notice to set up business on Panzra riverside road from tomorrow Dhule News
Nashik Onion News : कांद्याचे दर 2 हजारांच्या आत; शेतकरी संघटनांची बाजार समिती बंदची हाक

व्यावसायिकांना आदेश

या पार्श्वभूमीवर देवपूरमधील आग्रा रोडवरील नगावबारी येथील उड्डाणपूल ते पांझरा नदीलगत मोठ्या पुलापर्यंत दुतर्फा भाजी, फळफळावळ, खाद्यपदार्थ व इतर साहित्य विक्रेत्यांनी बुधवारपासून मोठ्या पुलाखाली पांझरा नदीकिनारी असलेला मार्ग ते हत्ती डोहापर्यंत एका रांगेत हातगाडी लावून व्यवसाय करावा.

तसेच आग्रा रोडवरील दसेरा मैदान ते गांधी पुतळ्यापर्यंत दुतर्फा हातगाडीधारक, पथारीधारक भाजी, फळविक्रेते, खाद्यपदार्थ, तसेच इतर साहित्य विक्रेत्यांनी पांझरा नदीकिनारी अग्रवाल भवनापासून पुढे साक्री रोडवरील (समतानगर) नदी पुलापर्यंत एका रेषेत हातगाडी लावत व्यवसाय करावा, असा आदेश बजावण्यात आला आहे.

संपूर्ण आग्रा रोडवर कुठलाही विक्रेता आढळल्यास महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन संयुक्‍त कारवाईतून विक्री साहित्य, हातगाड्या जप्त करतील. अशा होणाऱ्या नुकसानास अतिक्रमणधारक जबाबदार असेल, कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल, असे प्रशासक दगडे-पाटील यांनी कळविले आहे.

Administrators decision on hawkers zone notice to set up business on Panzra riverside road from tomorrow Dhule News
Jal Jeevan Mission : जलजीवनच्या 32 योजनांची कामे कागदावरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com