निवडणूक संपली..आता चर्चा विजयाची

ghoti election.jpg
ghoti election.jpg

नाशिक : सोमवारी (ता.२१) पार पडलेल्या मतदानात जिल्ह्यातील सर्वच मातब्बरांनी गेल्या पंधरा दिवसापासून प्रचारासाठी चांगलेच कंबर कसली होती, तर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांनी देखील हजेरी लावत प्रचासभा घेतल्या होत्या. त्यात कोणत्या पक्ष्याच्या उमेदवारास किती फायदा झाला, याचे चित्र मात्र येत्या (ता.२४) लाच स्पष्ट होणार आहे.
     

चौका-चौकात रंगतेय आकडेमोड; कोण येणार निवडून चर्चेला उधाण 

या निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीमध्ये ६ ते ८ टक्क्यांची घट झाली आहे. तर शहरापेक्षा ग्रामीण भागातून मतदानाचा उत्साह हा जास्त पहावयास मिळाला आहे.त्यामुळे निकाला बाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच उत्सुकतेने आता शहरात तसेच गावातील कट्ट्यावर, वाट्यावर, पारावर आणि चावडीवर, नेमके कोण विजयी होणार? याची आकडेमोड सुरु झाली. या मतदार संघातून, तालुक्यातून, गावातून इतके मतदान झाले. या पक्षाला इतकी लीड मिळाली आहे. त्या भागात त्या पक्षाला लीड मिळेल.अशा चर्चा चांगल्याच रंगत आहेत. कागदावर आकडेमोड करील आपलाच पक्ष विजयी होईल.अशी आकडेमोड केलेली पोस्ट व्हायरल केली जात आहे.असे असले तरी या निवडणुकीचा निकाल प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत या चर्चा अशाच जोरदार सुरूच राहातील यात मात्र शंकाच नाही.
 

नजरा निकालाकडे

मात्र, आज तरी ज्या मतदारांनी ज्या उमेदवारांना मतदान दिले आहे. अशा सर्वच मतदारांना आपलाच उमेदवार विजयी होईल अशी खात्री वाटते आहे. अनेक जणांकडून विजयाच्या पैजा लागल्या तर नवल असणार नाही. त्यामुळे आता मतदानानंतर सर्वांच्या नजरा या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com