मनोरुग्ण महिलेच्या  बाळाचा अखेर मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

मनोरुग्ण महिलेच्या 
बाळाचा अखेर मृत्यू 

जळगाव : गोविंदा रिक्षाथांब्याजवळ मनोरुग्ण महिला बाळंतीण झाल्याची घटना घडली होती. बाळ व बाळंतिणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्‍टरांनी दुसऱ्या दिवसापर्यंत दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना आज सकाळी बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मात्र रुग्णालयाचा कारभार वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द केल्याचे सांगत हात वर केले. 

रस्त्यावरच दुपारी मनोरुग्ण महिलेने मुलीला जन्म दिल्याची घटना 22 मे रोजी घडली. वृत्तपत्र छायाचित्रकार व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून बाळ व बाळंतिणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू होऊन बाळ व बाळंतीण सुखरूप व ठणठणीत असल्याचे दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्‍टरांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आज सकाळी बाळाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके व ठोस कारण रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात येत नसून, संसर्ग झाल्याने मृत्यू ओढवल्याची शक्‍यता जिल्हा शल्यचिकित्सकांनीव्यक्त केली आहे. 

शीतपेट्या बंदची अडचण 
अवघ्या आठ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला. नंतर या बाळाचे वारसदार नसल्याने नियमाने किमान तीन दिवस त्याचा मृतदेह ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयातील शीतपेट्या बंद असल्याने मृतदेह ठेवण्याची अडचण निर्माण झाली होती. शीतपेट्या बंद असल्याने रुग्णालय प्रशासन पर्यायी व्यवस्था पूर्णतः निष्प्रभ असून, बाळाच्या जन्माच्या वेळी मदतीला हजर असलेले छायाचित्रकार वसीम खान यांच्यासह तरुणांनी पुन्हा मदतीला धाव घेत बाळाला ठेवण्यासाठी शीतपेटी व बर्फ उपलब्ध करून दिला आहे. 
.............................
 
Web Title: akher