Farooq Shah : मुख्य प्रशासकीय संकुलास मान्यता; 45 कोटींना मंजुरी

MLA Farooq Shah and Drawing of planned main administrative complex.
MLA Farooq Shah and Drawing of planned main administrative complex.esakal

धुळे : पाठपुराव्याअंती राज्य शासनाने धुळे (Dhule) शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी सादर केलेल्या मुख्य प्रशासकीय संकुलासंबंधी प्रस्तावास शुक्रवारी (ता. २४) मान्यता दिली. (Approval of proposed main administrative complex to bring all government offices under one roof dhule news)

त्यासाठी ४५ कोटींच्या निधीलाही मंजुरी दिली. शहरातील जमनागिरी रोडलगत शासकीय धान्य गुदामासमोरील सरकारी जागेत मुख्य प्रशासकीय संकुल साकारेल. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे वाचून सर्व अधिकारी एकाच ठिकाणी भेटू शकतील, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी ‘सकाळ’ला दिली.

मंत्रालयात धुळे मुख्यालयी साकारणाऱ्या नियोजित मुख्य प्रशासकीय संकुलाचे रेखाचित्र आणि याआधारे प्रेझेंटेशन करण्यात आले. धुळे मुख्यालयी असलेली असंख्य शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत आणि विखुरलेल्या स्वरूपात आहेत.

त्यामुळे संबंधित नागरिकांना त्या-त्या कार्यालयांतर्गत शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो की काही अडीअडचणी असो ते कार्यालय शोधण्यापासून त्रास, हेलपाटे सुरू होतात. त्यात वेळ, पैसे खर्च होतात. ते लक्षात घेऊन एकाच जागेत जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्वच अन्य शासकीय कार्यालये असावीत, अशी मागणी शासनाकडे केली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

MLA Farooq Shah and Drawing of planned main administrative complex.
Jalgaon News : मनपातील 14 रोजंदारी कर्मचाऱ्यांना आस्थापनावर समावून घेण्याचा निर्णय

त्यासाठी संकुलाचे रेखाचित्र बनवून या प्रस्तावास मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू केला. त्याचे प्रेझेंटेशन झाल्यावर राज्य शासनाने प्रस्तावास मान्यता दिल्याची, तसेच याकामी ४५ कोटींना मंजुरीही देण्यात आल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली.

अर्थसंकल्पात ४२ कोटी

शासनाकडे पाठपुराव्याअंती सादर करण्यात आलेल्या धुळे शहरातील विविध विकासकामांच्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात एकूण ४२ कोटींच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तसे पत्र शासनाकडून देण्यात आल्याची माहितीही आमदार शाह यांनी दिली.

जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नऊ कोटी रुपये, दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्या परिसरात ग्रंथालय इमारत व आवार भिंतीच्या बांधकामासाठी ११ कोटी ६४ लाख रुपये, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय

महाविद्यालयात निवासी वैद्यकीय अधिकारी व वसतिगृह बांधकामासाठी १२ कोटी ४ लाख रुपये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरण बांधकामासाठी एक कोटी ४१ लाख रुपये आणि जिल्हा न्यायाधीशांच्या निवासस्थानासह एकूण ४२ कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी प्रदान करण्यात आल्याचे आमदार शाह यांनी सांगितले.

MLA Farooq Shah and Drawing of planned main administrative complex.
Abhay Shasti Yojana : महापालिकेचे 9 कोटी रुपये वसूल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com