Nandurbar News : जिल्ह्यात आजपासून शस्त्र, जमावबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ban

Nandurbar News : जिल्ह्यात आजपासून शस्त्र, जमावबंदी

नंदुरबार : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम अन्वये शुक्रवारी (ता. १०) सकाळी सहापासून ते २४ मार्च २०२३ रात्री बारापर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. (Arms mob ban in district from 10 march nandurbar news)

हे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडेबाजार किंवा अंत्ययात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

हा आदेश पोलिस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सभा अगर मिरवणुका काढण्यास रीतसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Nandurbarbanned