नांदगाव - वीजवितरणाच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक

nandgao
nandgao

नांदगाव : वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मर्स स्थलांतरित प्रकरणात कनिष्ठ महिला अभियंताचा निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवायचा नसेल तर पन्नास हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मनमाड विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला आज दुपारी धुळे येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

शैलेशकुमार रमेशचंद्र असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. वीज वितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता स्तरावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी मनमाड रस्त्यावरील वीज वितरण विभागाच्या सबस्टेशनमध्ये आलेल्या कार्यकारी अभियंत्याने तक्रादार कनिष्ठ महिला अभियंत्यांकडून चाळीस हजार रुपये स्वीकारले. तेव्हा दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व पोलीस उपाधीक्षक शत्रुघन माळी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली धुळे येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक पवन देसले महेश भोरटेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील नरेंद्र कुलकर्णी,जयंत साळवे, संतोष हिरे कृष्णकांत वाडिले सतीश जावरे संदीप सरग, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी सुधीर सोनवणे, शरद काटके भूषण खलाणेकर, प्रकाश सोनार व संदीप कदम यांनी शैलेशकुमारला रंगेहाथ पकडले.

शैलेशकुमार रमेशचंद्र यांच्या कार्यशैलीविषयी वीज वितरण विभागातच आवाजात तक्रारींचा मोठा सूर ऐकू येत होता. त्यातच जळगाव बुद्रुक येथील वितरण विभागाच्या डीपी वरून होणारा गैर व्यवहार व त्यातून मिळणाऱ्या लाभावरून अधिकारी पातळीवर गेल्या काही दिवसापासून कुरघोडी सुरूच होत्या. गेल्या सात मार्चला जळगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याविरुद्ध कनिष्ठ महिला अभियंताच्या सांगण्यावरून लाईनमन सुनील गायकवाड याच्या फिर्यादीवरून आनंदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. नमूद गुन्ह्यात कार्यकारी अभियंता शैलेश कुमार याने डीपी शिफ्टिंग प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रारदार कनिष्ठ अभियंता महिलेला तुझा निलंबनाचा कसुरी अहवाल का पाठवू नये यासाठी व सहकार्यासाठी पन्नास हजार रुपयाची मागणी करीत होता. परंतु तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत तक्रार केली. या तक्रारीत तथ्य आढळल्याने धुळ्याच्या लाचलुचपत ही कारवाई केली. 

काय आहे हे डीपी प्रकरण?

माणिकपुंज धरणातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज वितरण विभागाच्या वतीने पाण्याचा उपसा करण्यासाठी मोठ्या संख्यने डीपी अथवा ट्रान्सफॉर्मर्स बसविलेले आहेत. गेल्या वर्षाच्या टंचाईच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या डीपी उत्तरावून ठेवण्यात आल्या होत्या.

यंदा समाधानकारक धरणात जलसाठा मुबलकी झाल्याने शेतकऱ्यांकडून उतरविलेल्या डीपी पुन्हा चढविण्यासाठी मागणी केली जाते. वीज वितरण विभागाकडून विद्युत प्रवाह विखंडित करून पुन्हा डीपी चढविण्यासाठी होणारा आर्थिक व्यवहार हा कळीचा मुद्दा बनला आहे.

जळगाव बुद्रुकच्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सदर महिला अभियंता बद्दल वरिष्ठाकडे टँकर दाखल केली होती त्यानुसार त्यांच्या निलंबनाचा खाते निहाय प्रस्ताव पाठवायचा होता मात्र असा प्रस्ताव पाठवायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची मागणी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार रमेशचंद्र यांनी केली. आपल्याला लाच द्यायची नसल्याने सदर महिला अभियंत्याने सरळ लाचलुचपत विभागाकडे आपली तक्रार दाखल केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com