Ashish Phirke
sakal
जळगाव: भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेलमध्ये मोठा खर्च केल्यानंतर मालकाने हॉटेल खाली करून देण्यासाठी तगादा लावला होता. वारंवार मालकाकडून आणलेल्या दबावाला कंटाळून हॉटेलचालक आशिष मधुकर फिरके (वय ४८, मूळ रा. सांगवी, ता. यावल, ह. मु. संत निवृत्तीनगर) यांनी हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केली.