Dhule News: आश्रमशाळेचे विद्यार्थी बनले भाजीपाला उत्पादक; वार येथे आत्मनिर्भरतेकडे वाटचालीचे आदर्शवत धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Student picking vegetables and chillies.

Dhule News: आश्रमशाळेचे विद्यार्थी बनले भाजीपाला उत्पादक; वार येथे आत्मनिर्भरतेकडे वाटचालीचे आदर्शवत धडे

धुळे : वार (ता. धुळे) येथील केंद्रीय आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आत्मनिर्भरतेचे धडे गिरवीत आहेत. त्यांनी संस्थाचालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून एक एकर क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे.

मेहनत आणि जिद्दीच्या बळावर मशागतीसह बीजरोपण व काढणीपर्यंतची कामे विद्यार्थी आवडीने करतात. त्यांनी भाजीपाला उत्पादनातून चांगला नफाही कमाविला आहे. (Ashram school students become vegetable growers Exemplary Lessons on Way to Self Reliance at War Dhule News)

विद्यार्थ्यांनी स्वतः बियाणे व रोपे पेरून मिरची, टोमॅटो, प्लॉवर, कोबी, दुधी, वांगी आदींचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी सुरवातीला शेतीची मशागत, बाजारपेठेतून बी-बियाण्यांची माहिती घेत लागवड केली. सेंद्रिय भाजापाला घेताना पूरक फवारणी, निंदणी, पाणी देणे, सेंद्रिय खते देण्याची कामेही केली. त्यात त्यांनी शेतीचा खर्च काढत चांगला नफा मिळाला आहे. यातून पुढील पिके विद्यार्थी घेतील.

शैक्षणिक ज्ञानाबरोबर फावल्या वेळेत शाळा आवारातील एक एकर क्षेत्रात पालेभाज्यांची शेती बहरली आहे. आश्रमशाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत वृक्षलागवडीसह विद्यार्थी आवडीनुसार निरनिराळे प्रयोग राबवितात. सकाळी व सायंकाळी पिकांना पाणी देण्यासह इतर कामे उरकतात. सेंद्रिय पालेभाज्या कशा पद्धतीने पिकविता येतील याचे धडे गिरवीत वारच्या या विद्यार्थ्यांनी समाजासमोर चांगले उदाहरण ठेवले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Jindal Fire Accident : धुराच्या लोळांनी व्यापला आसमंत! कामगार मंत्र्यांकडून पाहणी अन् परिसरात हायअलर्ट

व्यवहारही हाताळतात

उत्पादित सेंद्रिय भाजीपाला आश्रमशाळेत स्वयंपाकासाठी वापरला गेला, तर इतर पालेभाज्यांची विक्री केली गेली. यातील सर्व व्यवहारज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले व व्यवहारही विद्यार्थ्यांनीच हाताळला आहे.

त्यामुळे व्यायामासह शेतीविषयक ज्ञानात भर पडत असल्याचे विद्यार्थी सागर मोरे, सुरेश मोरे, गणेश पावरा, रेखा शिरसाट, पूनम वानखेडे, मोगरा भोसले, तेजस म्हसदे, हरीश साळवे, भूषण पवार आदींनी सांगितले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते, मुख्याध्यापक शेखर भावसार, अरुण मराठे, नागेश्वर बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: Jindal Fire Accident : SDRF पथक तळ ठोकून; NDRFच्‍या जवानांची मदत