गावागावांत वाढली स्वच्छतेविषयी जागरूकता!

पी. एन. पाटील
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

धुळे - ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचवण्यासाठी राज्य शासनाने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २००१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा सुरू केली आहे. २००२-०३ पासून स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडित विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षीस देण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. यामुळे गावागावांत स्वच्छतेविषयी जागरूकता वाढली आहे.

धुळे - ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचवण्यासाठी राज्य शासनाने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २००१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा सुरू केली आहे. २००२-०३ पासून स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडित विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षीस देण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. यामुळे गावागावांत स्वच्छतेविषयी जागरूकता वाढली आहे.

केंद्रशासनाद्वारे निर्मल भारत अभियानाच्या निकषांमध्ये व नावात बदल करून २ ऑक्‍टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार २ ऑक्‍टोंबर २०१९ पर्यंत राज्यातील संपूर्ण ग्रामीण भाग ‘हागणदारीमुक्त’ करण्याचे निश्‍चित केले आहे. 

राज्यातील २७, ८०० ग्रामपंचायतअंतर्गत १०० टक्के हागणदारीमुक्त शाळा, अंगणवाडी, गावातील परिसर पूर्णपणे स्वच्छतेवर भर देऊन अशुद्ध पाण्यामुळे वैयक्तिक व परिसर अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांशी, पदाधिकाऱ्यांशी समन्वय वाढवीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानावर भर दिला जात आहे. ऑक्‍टोबर २०१६ मध्ये हागणदारीमुक्त गावांची पडताळणी करण्यासाठी विस्तृत मार्गदर्शक सूचना देखील करण्यात आल्या आहेत. 

स्वच्छ ग्राम स्पर्धांतर्गत प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या पंचायत समिती स्तरावरील विजेत्या ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येऊन अनुक्रमे २५०००, १५०००, १०००० ऐवजी अनुक्रमे १,००,०००, ५०,००० व २५,००० रुपये करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रथम ते तृतीय येणाऱ्या गावांना (ग्रामपंचायत) अनुक्रमे पाच, तीन व दोन लाख रुपये देण्यात येतील. धुळे जिल्ह्यात तालुकास्तरीय प्रथम आलेले गाव आता जिल्ह्यातील प्रथम क्रमांकासाठी प्रयत्नशील आहे.  १ मे २०१७ रोजी पुरस्काराबाबत घोषणा होईल. 

अभियानाची पूर्वतयारी 
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सुरवात २ ऑक्‍टोबरपासून होत असली पूर्वतयारी १ ते ३१ मे कालावधीत केली जाते. यात राज्य पातळीपासून संबंधित विभागाचे मंत्री, सचिवापासून जिल्हास्तरापासून ग्रामीण भागापर्यंतचे कर्मचारी, सेवाभावी संस्था जागृतीपर सभा, मेळावे घेणाऱ्या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करून सहभागी करून घेतले जाते.

वर्षभर नियोजनानुसार ग्रामसभा, ग्रामपाणीपुरवठा व समितीची बैठक महिला ग्रामसभा याद्वारे ग्रामस्थांचा सहभाग वाढवत गाव, वस्ती प्रभागामध्ये स्वच्छतेशी निगडित गोष्टींवर भर दिला जातो. शौचालयाचा वापर हात धुवा मोहीम वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, रस्ते, सफाई, श्रमदान, मोहीम, गोठा व जनावरे स्वच्छता मोहीम, यावर भर दिला जातो. पाणी शुद्धता, सांडपाणी व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर, जागृतीसह विकास कामांवर लक्ष दिले जाते. 

पंचायत समिती स्तरावरील विजेते
(प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने )
 धुळे तालुका - वडगाव, शिरडाणे, खंडलाय खुर्द
 शिरपूर तालुका - उपरपिंड, बाळदे, साकवद
 साक्री तालुका - मलांजन, काकसेवड, सुकापूर
 शिंदखेडा तालुका - टेंभलाय, चौगाव खुर्द, दलवाडे प्र. न.

Web Title: awareness of cleanliness in the villages